संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त पातोंडा येथे वैचारिक प्रबोधन

  38

  ✒️अमळनेर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  अमळनेर(दि.1मार्च):- येथील पातोंडा गावात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त वैचारीक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याबाबत सविस्तर माहिती अशी की, संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पातोंडा ता. अमळनेर जि. जळगाव या ठिकाणी वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उदघाटन संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तात्यासाहेब महात्मा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख वक्ते त्रिरत्न अकॅडमी, पिंप्री चे संचालक सतिश शिंदे यांनी सांगितले की फेब्रुवारी महिना हा जयंतीचा महिना आहे.

  या महिन्यात असलेल्या जयंती उत्सवात संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज, संत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय सतिश शिंदे यांनी करून दिला. तद्नंतर छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगावचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ‘ऐसा चाहू राज मैं, जहा मिले सबन को अन्न। छोट बडे सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न।’ असे तत्वविचार देणारे संत रविदास महाराज खऱ्या अर्थाने समतेचे उपासक होते. सर्व बहुजन महापुरुषांनी जात – पात, धर्माच्या पलीकडे कार्य करत फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म वाढवला, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पातोंडा गावाचे सरपंच, भरत देवा बिरारी होते. प्रमुख वक्ते त्रिरत्न अकॅडमी, पिंप्री चे संचालक सतिश शिंदे व छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगावचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर जगन्नाथ सोनवणे, ग्रामपंचायत प्रतिनिधी, प्रशांत पवार, महेंद्र पाटील, शरद शिंदे, माजी ग्रामपंचायत सरपंच जगन्नाथ संदानशिव, सेवानिवृत्त PSI रघुनाथ संदानशिव, बहुजन क्रांती मोर्चा धरणगावचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ ज्ञानेश्वर सोनवणे, सुनील वानखेडे, प्रफुल पवार, आकाश पाथरवट, क्रीष्णा मोरे, राहुल वाघ, बंटी बिजबीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  कार्यक्रमाला किशोर सोनवणे, सुनील चित्ते, गुलाब सोनवणे, दीपक सोनवणे, अविनाश सोनवणे, किरण शेवाळे, विजय महाले, गणेश सोनवणे, स्वप्निल सोनवणे, सागर मोरे, चंद्रकांत सोनवणे, राकेश सोनवणे, मिनेश सोनवणे, आसिफ खाटिक, राहुल संदानशिव, सुपडु संदानशिव, संदीप बैसाणे, किरण शिरसाठ तसेच सर्व चर्मकार समाज बांधव व निळे वादळ युवक मंडळ यांच्यासह गावातील सर्व समाजाचे बंधू – भगिनी व युवक यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विजय पुंडलिक सोनवणे, संतोष रतन सोनवणे व सर्व चर्मकार समाज बांधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साळवा ता. धरणगाव येथील जि. प. शाळेचे शिक्षक विलास चव्हाण यांनी केले.