चला महिलांनो उद्योजक बनू या

27

महाराष्ट्रीय मानसामध्ये स्वतः चा व्यवसाय करून स्वतः मालक होण्याची मानसिकता नाही. महाराष्ट्रीयन माणुस अगोदर शिक्षण मग नोकरी आणि नोकरी नाही मिळाली तर खाजगी मध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो. लाखो रुपये भरून नोकरदार होण्याची माणसिकता आज आपल्यामध्ये आहे. परंतु हजारो रुपये गुंतवणूक करून लाखों रुपयांचा मालक होण्याची स्वप्न आपण बघत नाही. व्यवसायाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन च वेगळा आहे. आपण स्वतः गुलामगिरी ची सवय लाऊन घेऊन मर्यादित कमाई करतो पण व्यवसाय हे असे क्षेत्र आहे जेथे स्वतः मालक बनून अमर्याद आपण कमवू शकतो. परंतु आपली माणसिकता आहे ती फक्त नोकरी करण्याचीच. मग नोकरी कोणतीही असो, पण नावाला नोकरी पाहिजे. माणूस नोकरी मध्ये व्यस्त होतो मग ती खाजगी असो वा सरकारी, त्यामुळे त्यांच्या डोक्यात व्यवसाय करण्याचा विचार येत नाही.

आणि विचार आला तर रिस्क घेण्याची तयारी नसते. आपला सर्वात मोठा दोष म्हणजे आपण व्यवसाय करायला रिस्क घेत नाही आणि व्यवसाय करताना आपल्याला नफा हा पहील्याच दिवसापासून पाहिजे. काही काही लोक व्यवसाय सुरू ही करतात, कोणतीच माहीती नसते कोणाचाच सल्ला नसतो, व्यवसाय करण्याचे नियोजन न करता व्यवसाय सुरू केला जातो आणि दररोज नकारात्मक विचार डोक्यात येऊन एक दिवस तो व्यवसाय बंद करून टाकतो. मग बाकीचे लोक त्याचे उदाहरण देत बसतात त्याने व्यवसाय सुरु केला होता त्याचा चालला नाही, अस करून सर्व नकारात्मक माणसिकता डोक्यात घालुन दिली जाते परिणामतः आपण व्यवसाय सुरू करत नाही.

महिलांनी व्यवसायामध्ये का यायचे याचे उत्तर आहे. महिलांचे नियोजन, काटकसर, जिद्द आणि चिकाटीने कोणतेही काम करतात. म्हणून महिला जर व्यवसायामध्ये आल्या तर त्या यशस्वी व्यवसाय करू शकतात. शिवाय महिलांना जास्त पैसा अथवा लवकरच जास्त नफा पाहिजे असही काही नसतं त्यांनी घेतलेल्या मेहनतीवर त्यांचा घरखर्च जरी निघाला तरी महिला समाधानी असतात म्हणून महिलांनी व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. व्यवसाय करायचा तर अगोदर महिलांनी मनामधिल संकोच बाजूला ठेवावा कारण संकोच कोणतेच काम होऊ देत नाही. उलट महीलांनी थोडा विचार करावा आपण भांडी घासतो तर भांडी, भांडी घासण्यासाठी लागणारी घासणी, साबण वा लिक्विड, साबन ठेवण्याचा स्ट्रे सर्वच तर विकत आणतो.

सांगण्याचा उद्देश हाच कि जर आपण भांडी घासण्याची घासणी सुद्धा विकत घेतो तर याचा अर्थ बाजारात सर्व वस्तू विकल्याच जातात फक्त ते विकण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. विकायचे म्हणजे आपल्याला स्वतः घरोघरी जाऊन जाहीरात करायची नाही. स्वतः जाऊन विकायचे सुद्धा नाही. आज आपण मार्केट चा विचार केला तर लोकांच्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की लोकांना वस्तू कमी पडत आहेत पण गरजा काय पुर्ण होत नाहीत. म्हणजे आपल्याला फक्त सुरवात करायची आहे मार्केट आपलीच वाट बघत आहेत. महिलां साठी कमी खर्चात, घरी बसून वा थोडफार फिरून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांना ज्याची आवड असेल त्या क्षेत्रात त्या व्यवसाय करू शकतात. जसे कोणाला कलाकुसरीचे काम येत असेल तर त्यालाच व्यवसाय रुपाने समोर आणता येते.

कोणाला कपड्यावर डिजाईन काढता येत असेल, रांगोळी काढता येत असतील, शिलाईकाम, किंवा तत्सम इतर व्यवसाय महिला यशस्वी पणे करून चांगले उत्पन्नाची कमाई करू शकतात. घरगुती वस्तु तयार करणे, लहान मुलांची खेळणी तयार करण्यासारखे व्यवसाय सुद्धा सुरू करून कमाई करू शकतात. कोणाला बोलण्याची कला असेल त्याचे रुपांतर सुद्धा आपण व्यवसायामध्ये करू शकतो. आणि एखाद्या महिलेकडे वरिल काहीच नाही पण पैसा आहे ती महिला मोठा व्यवसाय करून जास्तीत जास्त पैसा कमवू शकते. यासाठी आवश्यक असते ईच्छा शक्ती आणि सकारात्मक विचार हे तर स्वतः जवळच असते, दुसरं आहे गुंतवणूक आणि योग्य मार्गदर्शन एवढे जर असले तर आपण आपला व्यवसाय सुरू करू शकता. ईच्छा शक्ती आणि मार्गदर्शन असेल तर कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा आपला व्यवसाय उभा राहु शकतो. व्यवसायच का करायचा तर यामध्ये व्यक्ती स्वतः च्या इच्छेनुसार काम करू शकतो, आपल्या वस्तुची किंमत आपण ठरवू शकतो आणि खुप काही पैसा कमाऊ शकतो.

व्यवसाय करताना किंवा जिवन जगताना लोक काय म्हणतील? मला जमेल का? व्यवसाय करणे आपले काम नाही? असे फालतू आणि कमकुवत करणारे प्रश्न बाजूला काढून टाकायचे. कारण कधी पण सकारात्मक विचार करून पाऊल उचलायचे, नकारात्मक विचार केला तर पिण्याचे पाणी विस रुपये लिटर हे शक्यच नाही पण आपण विस रुपये लिटर मिनरल बॉटल घेऊन पाणी पितो. आपल्याला मोफत असलेले पाणी विस रुपये लिटरने विकत घेताना संकोच वाटत नाही, मग तेच पाणी किंवा इतर एखादी वस्तू विकण्याची का लाज वाटत असेल. व्यवसाय सुरू करायचा तर आपल्या मध्ये प्रचंड सकारात्मक विचार व स्वतः वर विश्वास पाहिजे. आणि विश्वास आपण शिकायला पाहिजे हायवेवर रस्त्याच्या कडेला चष्मे, हेल्मेट, फ्रुट, खेळणी, वा ईतर वस्तू विकणाऱ्या लोकांकडून. भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि त्या गोंधळात गावाच्या बाहेर हे लोक चांगला व्यवसाय करतात उन्हात, अंधारात उभे राहून मस्त व्यवसाय करून चांगली कमाई करतात.

अजून एका ठिकाणाहून आत्मविश्वास शिकण्या सारखा आहे तो म्हणजे बस मध्ये पुस्तक, फळ, नास्ता, आरोग्य, किंवा कॉसमँटीक सारखे काही ना का विकणाऱ्या कडून. दूरवरून प्रवास करून आलेले प्रवासी, पाच मिनिटे थांबणारी बस आणि त्यात त्याची मार्केटिंग म्हणजे किती मोठा विश्वास असतो स्वतः वर. आणि आपण बघतो एका बस मध्ये चार पाच वस्तू सहज विकल्या जातात, अस जर एका दिवसाची बेरीज केली तर कितीतरी गाड्या फिरून सुद्धा खुप मोठी कमाई होऊ शकते. खरचं ईच्छा शक्ती असेल तर आपल्याला व्यवसाय करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला, खुप मोठा नफा हा खुप कमी गुंतवणूकीवर मिळवू शकतो. व्यवसाय करताना आपल्या व्यवसायाचे ठिकाण आणि गुंतवणूक यापेक्षा आपल्याला ग्राहकांची गरज ओळखता आली पाहिजे याचे उदाहरण म्हणजे- २०१८-१९ चा उन्हाळा, कडकडीत उन आणि एवढ्या उन्हात गावापासून दुर दोन तिन निंबाचे मस्त घणदाट झाले, मनाला गारवा देईल अशी सावली आणि त्या सावली मध्ये दोन भाऊ लोकांना मिनरल वाटर विकत होते.

विस लिटरची कँन विस रुपयाला कँन घेऊन उन्हामध्ये गार सावली आणि थंडगार पाणी माणसाच्या मनाला वेगळाच आनंद देऊन जाते. पाणी पिल्या नंतर मी विचारले साधारण किती कँन पाणी रोज तुम्ही विकता तर त्यांचे उत्तर आले ५० कँन च्या वर विकतो. बघा व्यवसाय कोणताच छोटा नसतो पण नफा मात्र मोठाच असतो. मग विचार केला दररोज ५० कँन जरी गृहीत धरले एका एका कँनमध्ये २० ऐवजी १८ लिटर पाणी असे गृहीत धरले तर ५०×१८=९०० आणि ९०० लिटर पाणी फक्त पाच रूपयांनी जर गृहीत धरले तर ४५०० रुपये ते पाण्यावर कमवत होते.गुंतवणूक पकडली तर ५०कँनीचे २० रुपयांनी १००० होतात. हजार रुपयांची गुंतवणूक आणि ३५०० हजार रुपरेषा कमाई कीती टक्के झाली कमाई? आणि गुतवणुक सांयकाळी कँनवाल्यांना द्यायी. साधारण आपण विचार केला तर तिन लाख रुपये तिन महिन्यात कमाऊन मोकळे. आणि आपण नोकरी करतो दोन लाख रूपये प्रतीवर्षी ची. थोडक्यात काय तर तुमची इच्छा असेल तर व्यवसाय यशस्वी होतो. सुरवातीला घरखर्च भागवण्यासाठी महिलांनी व्यवसाय करावा. जेव्हा घरखर्च भागुन नफा जास्त उरेल तेव्हा महिलांचे पती स्वतः महिलांना सहकार्य करून तोच व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करतील म्हणून महिलांनी व्यावसायिक बनने काळाची गरज आहे.
=============================
✒️लेेेकख:-विनोद पंजाबराव सदावर्ते(मोटीवेशनल स्पीकर,व्यवसाय सल्लागार(संपर्क -मोबा: ९१३०९७९३००)
*Mail id: icandosurely@gmail.com*
=============================