दिव्यांग बांधव दिव्यांग मिञ अँप अंमल बजावणी नोंदणी पासुन वंचित – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

32

✒️अशोक हाके(बिलोली,विशेष प्रतिनिधी)मो.नं.9970631332

नांदेड(दि.1मार्च):-समाज कल्याण जिल्हा परिषद विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे समाजातील दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी गरजू दिव्यांग बांधवांना त्यांचा लाभ मिळावा म्हणून दिव्यांग मित्र नांदेड हे अॅप नव्याने विकसित करण्यात आले असून नांदेड येथे प्रस्तूत अॅपचे ऑनलाईन उद्घाटनराज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ८ जुलै २०२० ला करण्यात आले आहे.सदरील अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आपली नोंदणी
नऊ फोल्डर सविस्तर माहिती भराता येत नाहि तर अनेकांकडे मोबाईल नसते असला तर रिचार्ज नसते अशा अडचणी निर्माण होऊ नये व एकही दिव्यांग वंचित राहू नये.

म्हणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणुन दि 14 जुलै ते 31 जुलै पर्यंत नोंदणीकरावी व दि १ आँगस्ट ते १०आँगस्ट छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात यावे असे आदेशाला आठ महिन्यात अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अनेक संघटनेने निवेदन मोर्चाने शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करून न्याय मिळाला नाही. म्हणून दि २४ जाने २१ ला दिव्यांग वृध्द निराधार मार मूळ महाराष्ट्र यांच्या वतीने दिव्यांग बांधवाना न्याय हक्क द्या नसेल तर आम्हा दिव्यांगाना कुञ्यासारखे जीवन जगणे अशक्य असल्यामुळे आम्हा दिव्यांगास स्वईच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुदत धरणे आंदोलन शेकडो दिव्याग बाधवानी करीत असताना मग अतिरिक्त मुख्यकार्यकारी जि प सभाजकल्याण अधिकारी ईतर खाते प्रमुख यांनी धरणे आंदोलन स्थळी येऊन चर्चा करून न्याय हक्क देण्याचे लेखी देऊन धरणे आंदोलनापासुन परावृत केले प्रशासन यांचा मान राखून आंदोलन स्थगित करण्यात आले.

मा जिल्हाधिकारी साहेब धरूने आंदोलनाची दखल घेऊन दा ८ फ्रेबु २१ ला लेखी आदेश कनिष्ठ अधिकारी यांना वेळापञक दि १०फ्रेबु २१ ते २५ फ्रेबु २१ पर्यात प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, तालुका स्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी ,समाजकल्याण अधिकारी, आयुक्त साहेब ईत्यादी अधिकारी यांच्या वर जबाबदारी देऊन सुध्दा प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यामुळे अनेक दिव्यांग दिव्याम मिञ अँपपासुन वचित राहात असल्याने मग जिल्हाधिकारी साहेब आपल्या आदेशाला न माननार्या अधिकारी यांच्यावर दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवण्यार्या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करुन दिव्यांगाना न्याय देतील काय? असे प्रसिद्ध पञक दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर. . ज्ञानेश्वर नवले. राजु शेरकुरवार शंकर शिंदे. विठल बेलकर यादव फुलारी बालाजी ताटे, मोहन कऊटकर सुदर्शन सोनकांबळे, जाधव ज्ञानेश्वर, पांडुरंग सुर्यवंशी,सलिम दौलताबादी, हंनमत हेळगिर, रामदास कांबळे
यांनी प्रसिद्ध केले आहे.