मराठी राजभाषा दिन -कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन

26

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा ,
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा

मराठी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो . कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये पुणे येथे झाला . कुसुमाग्रजांनी कथा , कादंबरी , ललितलेख , नाटक व कविता अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले .यातील कविता लेखनात ते अधिक रमले . त्यांना तात्यासाहेब म्हणत.आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्त्वाचे लेखक म्हणून मानले जातात . शिरवाडकरांचे वर्णन सरस्वती मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात . मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक होत . चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी , नाटककार , कथाकार , कादंबरीकार , व आस्वादक समीक्षक प्रामाणिक सामाजिक आस्था , क्रांतीकारक वृत्ती , शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्टये.

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी ,
गेल्यावरही गगनातील
गोतांमधून राहिन मी

त्यांच्या कविता अधिकाधिक जीवनस्नमुख व मानवाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या चिंतनात्मक होत्या . विशाखा , जीवन लहरी , समिधा , छंदोमयी , रसयात्रा व प्रवासी पक्षी हे त्यांचे निवडक कवितांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत .

मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा ,
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा ….

कुसुमाग्रजांच्या अभिजात प्रासादिक चैतन्याने भरलेल्या कवितांनी मराठी मनाला बळ दिले , भरारी दिली . संवेदनशील कवी तसेच सुप्रसिद्ध नाटककार म्हणूनही ते प्रसिद्ध आहे . कुसुमाग्रजांची निष्ठा ,जीवनमूल्ये ही अतिशय प्रखर होती .व्यापक दृष्टिकोन , चिंतनशिलता ,माणूसकी , नितळपणा ,प्रमाणिकपणा , व्यापकता व त्यांचे प्रकटीकरण त्यांच्या साहित्यातून दिसून येते . त्यांच्या अनेक पाठ्यपुस्तकांमधील कविता अतिशय प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनावर अधिराज्य केल्याशिवाय राहत नाही .

म्यानातून उसळती तलवारीची पातं वेडात मराठे वीर दौडले सातं अभिरूची संपन्न साहित्यिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते .१९६४ मध्ये मडगाव येते झालेला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले . कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला असे अभिमानाने म्हटले जाते.आजच्या पिढीने . कुसुमाग्रजांच्या साहित्याचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे . माणसाला जगण्याची दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून होताना दिसून येते.

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जणाचे ,
कधी धनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे …..

त्यांच्या छंदोमयी काव्यसंग्रहातील कविता मराठीपणाचा खरा अर्थ सांगून जाते मराठी माणसाला माझ मराठीपण मी शोधलंसह्याद्रीच्या डोंगरात ,संतांच्या शब्दांत इतिहासाच्या पानांत सारे हसून म्हणाले आम्ही शोधलं आमच मराठीपण
या भूमीवरील माणसांच्या मनात ,त्यांच्या जखमांच्या रक्तातं
ज्यातून उसळतात सूर्याचे किरण मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला गवसणी घालणारे हृदयाला भिडणारे काव्यलेखन करणाऱ्या कुसुमाग्रजांना माझा मानाचा मुजरा
जय मराठी जय महाराष्ट्र
धन्यवाद ! !

✒️लेखिका:-सौ.चंदन सुशिल तरवडे( ढुमणे )
ता.कोपरगाव जि. अहमदनगर