शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) “ऋतू” स्पर्धेचा निकाल जाहीर

  37

  ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

  बिड(दि.1मार्च):-शब्दशृंगार साहित्य मंच महाराष्ट्रात नावाजलेला आहे , तसेच या साहित्य मंचात नवोदीत लेखनीस चालना नेहमीचं मिळत राहते. समुहातील सदस्या ,कवयित्री. आम्रपाली घाडगे यांचा मुलगा “ऋतूराज घाडगे” वय ९ वर्ष यांचा वाढदिवस एका स्पर्धेच्या माध्यमातून घेण्यात आला. स्पर्धेचे आयोजक कवयित्री सौ.आम्रपाली घाडगे , संयोजक कवयित्री कु. मयुरी कहाळे , तसेच विशेष सहकार्य कवी श्री.विकास पालवे , आणि समुह प्रशासक श्री. विशाल पाटील , वेरुळकर यांनी केले. स्पर्धेत एेकून ११७ स्पर्धकांना सहभाग नोंदवला. तसेच स्पर्धेच्या परिक्षण प्रसिद्ध कवयित्री सौ. क्रांती पाटणकर. बोरीवली यांनी केले.स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला व स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

  स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे.
  प्रथम रजिया जामदार. ५०१ रु. रोख व सन्मानपत्र , द्वितीय शामला पंडित. ३०१ रु रोख व प्रमाणपत्र ,तृतीय अमोल चरडे.२०१ रु रोख व सन्मानपत्र , तसेच उत्तेजनार्थ साहित्यिक व प्रसंजित तायडे , रेवती साळुंखे , किशोरी पाटील , सुनिता कपाळे , सौ.माधूरी काकडे , जया घुगे- मुंडे , श्रीकांत शिरभाते यांना प्रत्येकी १०१ रु.रोख व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

  स्पर्धकांवर शुभेच्छाचा वर्षाव समुहात सुरू होता. तसेच साहित्यिक मा.नरेंद्र गुळघाने , कवी. श्री.दिलीप काळे , जेष्ठ कवी जयेंद्र कोपर्डेकर , कवी. चं.मो.दुर्बे , कवी. अंगद दराडे ,कवी.दिनेश मोहरील. यांनी स्पर्धकांना पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.साहित्यक्षेत्रात नवेदीतांना हक्काचे व्यासपिठ मिळवून देनारे ,कवी/लेखक/गीतकार मा.श्री विशाल पाटील वेरुळकर. यांचे समुहातील सदस्यांनी विशेष आभार केले!