आर्दता मापक यंत्रातील हेराफेरीच्या चौकशीचा चेंडू सहायक उपनिबंधकांच्या कोर्टात

32

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2मार्च):-विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीन मधील आर्द्रता मापक यंत्रात हेराफेरी केल्याचा प्रकार महाराष्ट्र ऑइल मिल मध्ये 18 फेब्रुवारी रोजी उघडकीस बीबीबीबीबीहोता. या संदर्भात आज सोमवारी (1 मार्च) तहसीलदार यांनी सहाय्यक उपनिबंधक यांना आदेश काढून या संदर्भात योग्य ती कारवाई करत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.बारा दिवसापूर्वी पडेगाव येथील शेतकरी ग्यानबा बोबडे यांनी अग्रवाल यांच्या महाराष्ट्र ऑइल मिल येथे सोयाबीन विक्री साठी आनले होते. सोयाबीन चे माप होनेपूर्वी आद्रता मापनाच्या यंत्रात हेराफेरी झाल्याचा संशय आल्यावरून धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी ही बाब जिल्हाधिकारी परभणी यांच्या मोबाईलवरून कानावर घातली. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे साठी अधिकारी पाठवण्यास वेळ लावताच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी संवाद साधत सर्व हकीकत सांगितली.

केंद्रेकर यांनी सायंकाळी उशिरा दिलेल्या आदेशावरून सात वाजता नायब तहसीलदार गौरीशंकर आवळे, तलाठी चंद्रकांत साळवे, कार्यालयीन प्रमुख बीलापट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली होती. या सर्व तक्रारीवरून सोमवारी तहसीलदार स्वरूप ककाळ यांनी सहाय्यक उपनिबंधक गंगाखेड यांना आदेश काढून सदर प्रकरणाची योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले .या शेतकऱ्यांची लूट करण्याच्या प्रकारात सहाय्यक निबंधक तायडे काय चौकशी करतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.