चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती करिता जिल्हाधिकाऱ्याना निवेदन सादर

24

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.2मार्च):-चिमूर क्रांती भूमी व शहिदांना देशपातळीवर सन्मानित करण्याकरिता चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती चे निवेदन बालाजी महाराज बहुउद्देशीय व्यापारी मंडळ चिमूर कडुन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. व्यापारी मंडळाचे सचिव आणि चिमूर क्रांती भूमीला व शहिदांना देश पातळीवर सन्मानित करण्याच्या चळवळी चे मुख्य संयोजक सारंग दाभेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यां सोबत चर्चा करून निवेदनातिल ३१ मुद्द्यावर स्पष्टीकरण देवुन उद्देश स्पष्ट करून दिला. दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक अभिप्रायासह संबधित विभागांना निवेदन वर्ग करून अभिप्राय उलट टपाली कळविण्यात यावा.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चिमूर क्रांती भुमीतील मुख्य शहीद स्मारकाला भेट देवुन स्मारकाच्या जीर्णोद्धारा बाबत पहाणी करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन संबधित विभागाला पाठविण्याचे व शहीद स्मारकाला भेट देण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन देवुन अभिप्राय कळविण्यात येईल असे सांगितले. प्रसंगी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी बोकारे उपाध्यक्ष अशोकजी झाडे सचिव सारंग दाभेकर सह सचिव पप्पु शेख कोषाध्यक्ष प्रदीप साटोने संचालक घनश्याम रामटेके व दिलीप राचलवार उपस्थित होते.