सगरोळीच्या प्रशाळेत कंधारच्या बाल शौर्य पुरस्कार प्राप्त कामेश्वर वाघमारेचा गौरव

    33

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.2मार्च):-पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार प्राप्त कामेश्वर वाघमारे यांचा छत्रपती शिवाजी हायस्कुल शारदानगर सगरोळी तर्फे कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.महात्मा फुले विद्यालय घोडज ता कंधार येथे इयत्ता नववित शिकणा-या कामेश्वर वाघमारे यास दि.२६ जानेवारी रोजी पंतप्रभान बाल शौर्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्याच्या गावा शेजारील मन्याड नदीत पोहायला गेलेल्या तीनपैकी दोन मुलांचा जीव वाचविला.या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यु झाला.या त्याच्या धाडशी कार्याबद्दल त्याला बाल शौर्य पुरस्कार देऊन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित केले.हायस्कुल विभागातील मुला- मलींना त्याच्या साहसी कार्याची ओळख व्हावी व एक नविन प्रेरना मिळावी म्हणुन या कौतुक सोहळ्याचे १ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.त्याला प्रशालेकडून गोल्ड मेडल,एक होता कार्व्हर हे प्रेरणादायी पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

    या प्रसंगी हायस्कुल विभागातील बाल कविंना त्यांच्या प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यींनी शालेय जीवनापासुन धाडसी बनले पाहीजे.व आपले धैर्य इतरांच्या कामी आले पाहीजे असे प्रतिपादन कामेश्वर नी केले.यावेळी शिवाजी हायस्कुलचे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड,गिरीषआलुरकर,डी.जी.बामऩे,तिव्हाळे,जगाते,वाघमारे व सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी शिक्षकवृंद उपस्थित होते.