पुनर्वसन गावे जामणी व नवेगाव समस्या निकाली काढण्यासाठी खडसंगी येथे तहसिलदार व आर. एफ. ओ. यांची बैठक

    33

    ✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

    खडसंगी(दि.3मार्च):- जामनी व नवेगाव गावाचे पुनर्वसन झाले असुन सुद्धा या गावातील समस्या मार्गी लागल्या नाहीत. जामणी व नवेगाव या पुनर्वसन गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी मंगळवार २ मार्च रोजी बैठक घेण्यात आली. त्यावेळी तहसिलदार नागटीळक साहेब चिमूर व आर एफ ओ धानकुटे साहेब यांच्या अध्यक्षखाली प्रहार सेवक शेरखान पठान यांच्या नेतृत्वाखाली विश्राम गृह खडसंगी येथे बैठक घेण्यात आली.

    नवेगाव व जामणी या गावातील विविध समस्या सोयी-सुविधा व शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बैठकीत प्रहार सेवक अक्षय बोदुगलवार, प्रहार सेवक, कैलास आलाम ,प्रहार सेवक विनोद उमरे, ईदरशाहा मळावी , रघुनाथ रायशिडाम, प्रमोद धारणे, नानाजी उईके व जामणी व नवेगाव गावातील नागरिक उपस्थित होते.