कुंडलवाडी येथे मार्कंण्डेय जयंतीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न

71

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.3मार्च):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील विठ्ठल साई मंदीरात पद्ममशाली समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मार्कंडेय जयंतीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश सब्बनवार,तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्षा सुरेखा जिठावार,संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव सब्बनवार,शंकर लोलेवार,पद्मशाली साजाचे अध्यक्ष पोशट्टी पडकुटलार,नरेद्र जिठावार आदी उपस्थित होते.सर्व प्रथम मार्कंडेय यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

असून निकिता अशोक पडकुटलावर, नेहा किशन वासमवार, धनराज श्रीनिवास जिठावार, नक्षत्रा राजेश सब्बनवार,रजत राजेश्वर गरुडकर,प्रीती पोतलींग शक्करकोट, शताक्षी राजकुमार दाचावार, साईनाथ हनुमलु अंकमवार, ऋत्विक नागेश गरुडवार, ऐश्वर्या नरेंद्र जिठावार यांच्यासह नगराध्यक्षा सुरेखा जिठावार व संगीता प्रकाश मेरगेवार यांची भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शंकर लोलेवार यांनी मार्कंण्डेय यांच्या जीवन चरित्रावर पद्मशाली समाजाला सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजकुमार दाचावार यांनी मानले.