त्वरीतापुरी जिनिंगच्या संदर्भात शेतक-यांना दिलासा देणारा हा निर्णय – अॅड.सुरेश हात्ते

    36

    ✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114

    गेवराई(दि.3मार्च):-गेवराई तालुक्यातील तलवाडा शिवारातील त्वरीतापुरी शेतकरी सहकारी जिनिंगच्या जागे संदर्भात तक्रार कर्त्याने अतिक्रमण करुन जागा बळकावल्याचा आरोप औरंगाबाद विभागीय आयुक्ता कडे केला होता. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशा नुसार गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांनी जिनिंगचे अध्यक्ष अॅड.सुरेश ज्ञानोबा हात्ते यांना नोटिस बजावत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी त्वरीतापुरी शेतकरी सहकारी जिनिंगच्या जागेवरील सर्व बांधकाम केलेली जागा सिल करण्यात आली होती. या प्रकरणी औरंगाबाद ऊच्चनायालयाने वरिल आदेशास दिनांक २ मार्च रोजी स्थगती दिली असुन औरंगाबाद ऊच्चनायालयाचा हा निर्णय शेतक-यांना दिलासा देणारा आसल्याचे अॅड.सुरेश हात्ते यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना सांगीतले.

    या विषयी माहीती आशी की तलवाडा येथे त्वरीतापुरी शेतकरी सहकारी जिनिंग ही सन १९९८ साली स्थापन झालेली असुन त्या वेळेस बाजार समितीने ९९ वर्षाच्या करारावर गट क्र.१२३७ मधील तीन एक्कर जमीन करारनाम्या आधारे घेतलेली असुन त्या जागेवर जिनिंग सुरु करण्यात आली होती त्या वेळे पासुन आज पर्यंत जिनिंग आणी जागा संस्थेच्या ताब्यात आहे. सदर जिनिंगवर जिल्हा मध्यवर्ती बॅकेने १२ लाखाचे कर्ज पण दिले होते ते कर्ज संस्थेने परत फेड ही केलेले आहे.जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे पुर्ण कर्ज परत फेडणारी ही एकमेव शेतकरी संस्था असुन शासनाने या वर ४ लाख रुपय अनुदान ही दिलेले आहे. त्याची संस्थेने परतफेड देखील केलेली आहे. त्याच बरोबर बाजार समितिचे भाडे नियमित भरना केलेले असुन या सर्व बाबी रितसर आसतांना देखील राजकीय सुड भावनेतुन प्रशासनावर दबाव आनुन अतिक्रमण दाखऊन जिनिंग सिल करन्याची कार्यवाही तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात अली आसल्याचे माजी जिं. प. सदस्य त्वरीतापुरी शेतकरी सहकारी जिनिंगचे अध्यक्ष अॅड.सुरेश ज्ञानोबा हात्ते यांनी औरंगाबाद ऊच्चनायालयाच्या निदर्शास अनुन दिले.

    त्याच बरोबर तहसीलदार मार्फत आलेल्या नोटिस विरोधात औरंगाबाद ऊच्चनायालयात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रिट रिपेटीशन ६२०७/२०२१ नुसार अपील करण्यात आले होते. या मध्य अपील कर्त्याची बाजु व कागद पत्राची पाहणी करुन औरंगाबाद ऊच्चनायालयाने सदर प्रकरणी स्थगती दिली आहे. या प्रकरणी संस्थेच्या वतीने अॅड सचीन देशमुख यांनी काम पाहिले. स्थगती मिळाल्याने शेतकरी बांधव व हात्ते समर्थकांनी तलवाडा येथे तोफा वाजऊन आनंद साजरा केला.