शुन्य नजर

35

आज माझा लसीकरणाचा डोज असल्यामुळे मी १० :०० वाजता इंदिरा गांधी रूग्णालय नागपूर येथे निघालो.अनेक मित्रांनी लसीकरणाविषयी मोबाईलवर माहिती विचारली.कारण काही मित्रांच्या घरी तुम्ही लस घेऊ नका असा आग्रह धरला होता.पण आपण कर्मचारी आहोत आपल्याला लस घेणे आवश्यक आहे.मी मित्रांनी विचारलेल्या शंकाकूशंकाचे योग्य निराकरण करण्याचा प्रयत्न केला.आपण विज्ञानवादी युगात जगत आहोत.आपण विज्ञानाच्या कसोटीवर उतरणाऱ्या लसीचा डोज अवश्य घ्यावा.एक वर्षापासून हजारो शास्त्रज्ञ प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपले सर्वस्व देत आहेत.त्यांच्या पराकाष्ठाचे फळ म्हणजे विकसित झालेली लस आहे.भारतात या लसीकरणाची जी मोहीम सूरू आहे यात सर्वांनी सहभागी व्हावे.शासनाने कोणताही भेद न ठेवता सर्व भारतीय नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी.फक्त स्वःताचा फायदा न पाहता या महामारीने त्रस्त असलेल्या सर्व भारतीयांना लस द्यावी.

देशात अनेक समस्या आ वाचून उभ्या आहेत. शेतकरी बांधव जीवाची पर्वा न करता आपल्या मागणीसाठी आंदोलन करत आहात.सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न करता त्याला केराची टोपली दाखवली आहे.भांडवलदारी मित्रांच्या फायद्यासाठी साऱ्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न दुःखदायक आहे.शेतकरी यांची समस्या न सोडवता शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न बेजबाबदारपणाचा आहे.
माझे लसीकरण झाल्यानंतर काही वेळ तिथेच थांबलो.अनेक मित्रांनी लस घेतली.आपआपला अनुभव सांगितला.नंतर आम्ही घराकडे प्रस्थान केले.रस्त्याने जात असतांना माणसांच्या मनावर लॉकडाऊनचे सावट दिसत होते.नुकतीच जीवनाला गतिमानता येत असतांना पुन्हा लॉकडाऊन म्हणजे जीवनाची बर्बांदीच म्हणावी लागेल.उड्डाणपुल व चौकाचौकात अनेकांच्या नजरा शुन्यवत पाहायला मिळत होत्या.पुन्हा कोविड-१९ चा जोर वाढला होता.

आपण आपले जीवन कसे जगावे असा प्रश्न त्यांच्या मनपटलावर पडला होती.हा कोरोना राजकिय स्वार्थ साधण्याचं एक साधन आहे.अशी चर्चा नागपूरात सुरू झाली होती.माणसाच्या मनातील आनंद दूर पळाला होती.बर्डीवरील रेलचेल जेमतेम होती.अजूनही काही दुकाने बंद होती.चौकातील ठेलेवाले गिऱ्हाईकांची वाट पहात होते.दिघोरी उड्डाणपूल पार केला .ताजबागच्या मेनरोडवर भटक्या विमुक्ताची बिऱ्हाडे उतरली होती.लहानसान पोरंटोरं आई समोर खाण्यासाठी रडारड करत होते.आईच्या चेहऱ्यावरील उभा भारत मलूल झाला होता.लॉकडाऊनने गरीबाला उध्दवस्त केले होते.तर काही श्रीमंत करोडपती बनले होते.काही सरकारचा राजकिय फायदा झाला होता.आईने त्याच्या हातावर पाच रूपयांचा शिक्का दिला.तो त्याला न्याहाळत दुकानात गेला.दिघोरीचा उड्डाणपूल जवळ एक मुलगी हलणाऱ्या मानेचा कुत्रा विकण्यासाठी उभी होती.तिची शुन्यवत नजर कोणीतरी माल विकत घेईल याकडे लागलेली होती.शहरात धावणाऱ्या मोटारगाडीतील माणसे फक्त ते चित्र पाहात होते.ती सावलीच्या कडेला बसली व शुन्य नजरेनं मान हलणाऱ्या कुत्र्याकडे पाहात होती.

आज देशात साऱ्याच मानवाचे चेहरे मुलल झालेले आहेत.शेतकरी,कामगार,शोषित,पिडीत,युवक,आदिवासी,
भटकेविमुक्त,हॉलवाले,टॉंगेवाले,बँन्डवाले,हलवाईवाले,सफाईवाले,याचे चेहरे उदास वाटत होते.कोरोनाने देव नावाला हद्दपार केले होते.कोणातही देव धावून आला नाही.वणवण भटकणाऱ्या मानवाला तो वाचवू शकला नाही .कारण देव नावाची कोणती शक्ती नाही हे त्यांना माहित झाले होते.तरी सरकारचे नेते मंदिर बांधण्यासाठी मोठ्ठाले चंदे जमा करत आहेत . आमदांरानी मोठे मोठी बँनर लावली आहेत.यावर कोणीच काही बोलत नाही.मंदिरासाठी पैसा गोळा करणे म्हणजे गरीब माणसाचे रक्त शोषण होय.पण देशाचा राष्ट्रपती चंदा देत असेल तर देशाचे भविष्य कसे असेल हे सांगण्याची गरज नाही.तरूण पोरांना धर्माचे टॉनिक देऊन देश धर्ममय करणे व आपली पोळी शेकणे येवढाच नेत्याचा धंदा आहे.हा धंदा आम्ही नक्कीच बंद करू हा चंग साऱ्या भारतीयांनी मनी बाळगावा.देश ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्याचा नाही.तर आमच्या मुलनिवासीचा आहे.मी घराकडे वळलो चौकातील फेरीवाले जोरजोराणे ओरडत होते.टमाटर लेलो,बैंगन लेलो, पालक लेलो .स्वतःच्या मनात भविष्याचा वेध घेत जीवनसंघर्ष करत चालत आहेत न थांबण्यासाठी……नव्या स्वप्नांच्या दिशेने

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००