निफाड तालुक्यातील पिंपळगाव बेहेड गावात बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घडली घटना

24

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.5मार्च):- सावत्र बापाने आपल्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव येथील आकाश सचिन सूर्यवंशी राहणार चिंचखेड रोड यांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन सावत्र मुलीवर अत्याचार केला आहे. संशयित आरोपी यांचे पीडितेच्या आईशी प्रेम संबंध होते.

पीडितेने घटनेची माहिती आपल्या मावशीला कळवताच मावशीने मुलीला घेऊन पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन गाठले व बळजबरीने अत्याचार झाल्याची घटना दाखल झाली आहे.
सदर पित्याला तत्काळ अटक करण्यात आली व न्यायालयात हजर सादर करण्यात आले व त्यास पोलिस कस्टडीत ठोठावण्यात आली. संशयित बापा विरुद्ध नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.