अॅड. स्नेहा ओवे जिल्हा संयोजक पदावर नियुक्त

28

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.6मार्च):- बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग घटकाला शासनाच्या सर्व योजनांची माहिती व लाभ मिळावा या करिता तसेच पक्ष संघटनेला बळकटी देण्याकरिता भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आमदार अॅड आकाशदादा फुंडकर यांनी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष (संयोजक)पदी अॅड स्नेहाताई ओवे यांची नियुक्ती करण्यात आली.

जिगरबाज लढव्या दिव्यांग महिला असतांनाही दिव्यांग घटकाला न्याय देण्याकरिता अहोराञ श्रम घेत असतात. त्यांच्या नियुक्ती मुळे बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांगासह परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.