पत्रकारांचा अवमान करणा-या पोलीस निरीक्षकांस निलंबित करा – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी

30

🔸निलंबनाची कारवाई न केल्यास उपोषण करणार

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.6मार्च):- पत्रकार राजाराम बोराडे यांचा कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी अवमान केल्याप्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी ग्रामीण पोलीस अधीक्षक, सोलापूर यांच्याकडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने निवेदणाद्वारे मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष एम.आर. लोखंडे, माढा तालुकाध्यक्ष राजाराम बोराडे, गणेश टिंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.सविस्तर वृत्त असे की, दैनिक साहित्य सम्राटचे अधिकृत पुणे विभागीय संपादक राजाराम बोराडे यांच्या पत्नी सौ अनिता ताई बोराडे यांनी महिला अन्याय अत्याचार कायद्या अंतर्गत महावितरण कंपनीच्या वायरमन सह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती.

या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने संबंधित लोकांवर गुन्हे दाखल का झाले नाहीत या कारणासाठी दैनिक साहित्य सम्राटचे पुणे विभागीय संपादक राजाराम बोराडे हे कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांनी राजाराम बोराडे यांच्यासारखे अनधिकृत पत्रकार असतात नक्की आम्ही कोणाला अधिकृत समजायचे. संपादकाला , बातमी संकलन करणाऱ्याला की बातमी प्रकाशित करणाऱ्याला जसे आम्हाला पोलीस म्हणून अधिकृतरित्या अधिकार आहेत.

तसे आमच्या पोलीस मित्राला व होमगार्ड यांना अधिकार नाहीत त्याचप्रकारे पत्रकाराला सुद्धा अधिकृत अधिकार नाहीत अशी अवमानकारक भाषा वापरून अवमानित केले आहे. तुम्हाला पत्रकार म्हणून महाराष्ट्र शासनाने अशी विशेष सुविधा दिली आहे का ? पत्रकारांना होमगार्ड सारखीच वागणूक देणार अशी खालच्या पातळीची भाषा वापरून अपमानित केले आहे अशा वादग्रस्त पोलीस निरीक्षकास लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभचा आदर नसेलेल्या या पोलीस निरीक्षकास या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपणांस विनंती करण्यात येते की, वादग्रस्त पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांना या पदावरून तात्काळ निलंबित करून पत्रकारांना न्याय व संरक्षण मिळवून द्यावे अन्यथा येत्या २२ मार्च २०२१ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.