करमाळा उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सीझरचे दीडशतक पूर्ण

29

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

करमाळा(दि.6मार्च):- माढा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सीझरची सुविधा 23 जून २०२० पासून सुरू करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 162 महिलांचे सीझर व्यवस्थितपणे पार पडलेले आहे.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्त्रीरोग तज्ञ डॉ. निलेश मोटे , डॉ. आफ्रीन बागवान, डॉ. कविता कांबळे , डॉ. विशाल शेटे या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया पार पडत आहेत.

सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीला एखादे सिझर करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येत होता. हा खर्च करणे त्या कुटुंबाला शक्य नव्हते. म्हणून खास गोरगरीब जनतेसाठी उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सिझर ची सुविधा उपलब्ध केलेली असून या सुविधेचा लाभ तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा. असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.