तलाठी मनोज किशन नवाळे याला 13000 लाचप्रकरणी शिक्षा

33

🔸जिल्हा सत्र न्यायाधीश नाशिक यांनी दिला निकाल

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.6मार्च):- तलाठी नायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांनी तक्रारदार यांच्याकडे तेरा हजार रुपये मागणी केली होती तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालय येथे तक्रार केली दिली सदर आलेल्या तक्रारीवरून दिनांक 14 /8 /20 13 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा लावून तलाठी मनोज किशन नवाळे यांनी तेरा हजर मागणी करून ती रक्कम पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असतात त्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याविरुद्ध सिन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 30 17/ 20 13 भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे दिनांक 15/ 8/13 रोजी दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्याचा आज दिनांक 5/ 3/ 20 21 रोजी एस एस नायर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा नाशिक यांनी निकाल दिला असून त्यात मनोज किसन आवळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे सरकारी पक्षाचे कामकाज सहाय्यक सरकारी अभियोक्ता कडवे यांनी पाहिले तसेच कलम 13 2 प्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे