बलात्कार प्रकरणी अल्पवयीन युवकावर पॉस्को अंतर्गत युवकावर गुन्हा दाखल

35

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नासिक(दि.6मार्च):- सेल्फी फोटो व्हायरल करण्याची तसेच आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन युवकाने एका मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार जुने नाशिक भागात याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित 17 वर्षीय मुलाचा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पीडिते च्या आईने याविषयी गुन्हा दाखल केला आहे.

31 ऑगस्ट 20 19 रोजी मुलगी रस्त्याने पायी जात असताना संशयित तिचा पाठलाग करून मैत्री केली यावेळी त्याने आपल्या मोबाईलवर सेल्फी फोटो काढला त्यावेळेस मुलीचे आई वडील घरी नसल्याची संधी साधून त्याने घरात घुसुन सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने बलात्कार केला दोन वर्षापासून संशयित मुलीस घरात गाठून सेल्फी फोटो बाबत व आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार करीत होता अधिक तपास उपनिरीक्षक उनवणे करीत आहे