चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस एस. टी. बस फेरी तात्काळ सुरू करावी- व्यापारी मंडळ चिमूर

40

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.6मार्च):- चिमूर,आष्टी स्वातंत्र्य संग्राम क्रांती चा इतिहास देशवासीयांना भविष्यातही माहिती रहावा म्हणून चिमूर एस टी बस आगार अस्तित्वात नसतांना चिमूर-आष्टी सुपर एक्सप्रेस एस टी बस फेरी सुरू होती. मात्र स्वतंत्र चिमूर बस आगार निर्माण झाल्यानंतर चिमूर-आष्टी सुपर एक्सप्रेस एस टी बस फेरी मागील अनेक वर्षापासून बंद करण्यात आली आहे परिणामी चिमूर-आष्टी स्वातंत्र्य संग्राम क्रांती चा इतिहास झाकल्या गेला असून आज वयाचे पंचेविस वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींना सन 1942 च्या चिमूर-आष्टी स्वातंत्र संग्राम क्रांती बाबत माहिती नाही तर अनेक ज्येष्ट नागरिकांना चिमूर मधिल इतिहासाचा विसर पडलेला आहे. जनप्रतिनिधी व राजकारण्यांना स्वताच्या स्वार्था शिवाय निष्क्रिय राजकारण्यांना क्रांती भूमी कडे लक्ष देण्यास वेळ नाही.

बालाजी महाराज बहुउद्देशीय व्यापारी मंडळ चिमूर चे अध्यक्ष प्रकाशजी बोकारे व सचिव सारंग दाभेकर तथा चिमूर क्रांती भूमीला व शहिदांना देश पातळीवर सन्मानित करण्याच्या चळवळीचे मुख्य संयोजक यांनी एस.टी. बस आगार चिमूर चे प्रभारी आगार व्यवस्थापक इम्रान शेख यांना *चिमूर-आष्टी सुपर क्रांती एक्सप्रेस एस टी बस फेरी* तात्काळ सुरू करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी वरिष्ठ लिपिक एच के सिडाम उपस्थीत होते. चर्चे दरम्यान तीर्थ क्षेत्र आंभोरा मार्गे चिमूर-रामटेक व ब्रम्हपुरी-यवतमाळ ह्या आवश्यक एस टी बस फेऱ्या सुद्धा सुरू करण्याची विनंती केली आहे.