“हिंदी में रोजगार के अवसर” एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

    119

    ✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    हाणेगाव(दि.8मार्च):-कै.बापुसाहेब पाटील एकंबेकर ग्रामीण महाविद्यालय हणेगाव अंतर्गत दि.6/3/2021 या रोजी हिंदी विभागाच्या वतीने “हिंदी में रोजगार के अवसर” या विषयावर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागत गीत बी.ए.तृतिय वर्षाची विघार्थींनी कु.अश्विनी जाधव यांनी गायले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम मानवते यांनी भुषवीले तर प्रमुख पाहुणे म्हणुन हिंदी विभागाचे प्रा.डॉ.पाटील.ए.एन हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.बिरादार उमाकांत यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै.धुंडामहाराज महाविद्यालय देगलुर येथील डॉ.अभिमन्यु पाटील यांनी”हिंदी में रोजगार के अवसर ” या विषयावर उपस्थित विद्यार्थींना सविस्तर अस मार्गदर्शन केले.

    यावेळी देखील कार्यक्रमाचे औचित्य साधुन हिंदी विभागाचे प्रा.डॉ.पवन एमेकर यांनी विघार्थांना “हिंदी विषय की जरूरत और रोजगार” या विषयावर मार्गदर्शन केले . बी.ए.प्रथम वर्षाचा विघार्थी पवार उध्दव यांनी सुंदर असे गीत गायीले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मानवते उत्तम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ” हिंदी आणि विश्व” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन बी.ए.तृतिय वर्षाची विघार्थींनी कु.सारीका पवार यांनी केले तर आभार कु.पुजा जोशी यांनी मानले.या कार्यक्रमास डॉ.दिलीप जाधव, डॉ.साबने, डॉ.हंगरगेकर,डॉ.कळसकर, डॉ.शिंदे, डॉ.सागावे,प्रा.साधने , प्रा.बालाजी राठोड, श्री.भाऊराव पवार ,संतोष सुरेवाड,मारोती चव्हाण आदीची उपस्थिती होती.