महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे नासिक जिल्हाध्यक्ष हभप श्रावण महाराज आहिरे कुकाणेकर यांची नियुक्ती

27

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.8मार्च):-महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ नाशिक जिल्हाध्यक्ष अणासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणात्सव आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय कार्यकारणीकडे पाठवला वारकरीो महामंडळ राष्ट्रीय कार्यकारणी मंजुर करुन रिक्त झालेल्या पदावर हभप श्रावण महाराज अहिरे कुकाणेकर यांची नेमणूक राष्ट्रीय कार्यकारणीने जाहीर केली.

राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, कार्याध्यक्ष रामेश्वर महाराजशास्त्री,सचीव वाळुंज साहेब फुल सुंदर ,जेष्ट मार्गदर्शक महामंडलेश्वर महंत रघुनाथ महाराज देवबाप्पा व रामकृष्णदास महाराज लहवीतकर ,मार्गदर्शक समिती प्रमुख पंडित महाराज कोल्हे , कोषा ध्यक्ष दत्तू पा डुकरे ,तसेच संपुर्ण जिल्हा कार्यकारणी माधव महाराज शास्त्री ,अमर ठोंबरे , चंद्रकांत दादा आहेर, बाळासाहेब कबाडे ,दत्तात्रय तुकाराम डू करे, शिवनाथ भवर, काशीनाथ व्यवहारे ,मधुकर ठोंबरे ,लहु महाराज अहिरे, संदिप म खकाळे, सुदर्शन महाराज शिंदे.यांचेकडून अंतीम निर्णयास मंजुरी देऊन श्रावण महाराजअहिरे यांची नियुक्ती निश्चीत करण्यात आली.

या निवडीबद्दल जिल्ह्या कमेटी तसेच सर्व तालुका कमेटी ने स्वागत केले , विषेशकरुन त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष देविदास जाधव जनार्दन पारधी मामासाहेब नांदुर्डीकर नासिक तालुका अध्यक्ष लहुमहाराज अहिरे संदीप महाराज ख काळे चांदवड तालुकाध्यक्ष राजेंद्र महाराज काळे खंडू महाराज भगत शाम महाराज गांगुर्ड यांनी हभप श्रावण महाराज अहिरे यांचे अभिनंदन केले .आहे