जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी रमेश महाजन यांचा उत्कृष्ट महिला BLO पुरस्कार देऊन सन्मान

    35

    ✒️चाळीसगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चाळीसगांव(दि.८मार्च):- सोमवार रोजी तहसील कार्यालय चाळीसगांव येथे निवडणूक विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.चा. येथील उपशिक्षिका हेमांगी रमेश महाजन ०१७ चाळीसगांव विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रं.१६० मध्ये यादी पूनरिक्षण काम उत्कृष्ट रित्या पुर्ण केल्याबद्दल तसेच यात जास्तीत जास्त महिलांची नावे नोंदणी केल्याबद्दल यांचा उत्कृष्ट महिला बी.एल.ओ.म्हणुन सन्मान करण्यात आला.

    याप्रसंगी प्रांतधिकारी मा. साताळकर साहेब, तहसीलदारसो. अमोल मोरे साहेब व नायब तहसिलदारसो. मा.भालेराव साहेब यांच्या शुभहस्ते हेमांगी रमेश महाजन यांना प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आहे.याप्रसंगी प्रांतधिकारी मा.साताळकर साहेब, तहसीलदारसो. अमोल मोरे साहेब व नायब तहसिलदारसो. मा.भालेराव साहेब तसेच तहसील कार्यालयातील व निवडणूक शाखेतील मान्यवर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.