के रामलू शाळेत जागतिक महिला दिनानिमित कामगार महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.8मार्च):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे दि. 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सुरेखा जिठ्ठावार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. लिला हणमंतराव लखमपुरे व डॉ. अश्विनी प्रशांत सब्बनवार तसेच शाळेचे संचालिका रमा सायन्ना ठक्कुरवार हे मान्यवर उपस्थित होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेचे महिला सफाई कामगारांचे शाळेच्या वतीने प्रमुख अतिथीच्या हस्ते साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले तसेच शाळेची महिला शिक्षिका व सेविकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शाळेतील मुलांनी गीत व महिला जीवनावर भाषणे केली तसेच शाळेतील शिक्षका संध्या मॅडम, सपना मॅडम व विद्या ताटे यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील कु. आंचल जोशी व कु. समरनिका गादगे या मुलींनी केले. तर सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच महिलांचे संचालिका सौ. रमा ठक्कुरवार यांनी आभार मानले.