सूभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयास द्या

28

🔸धनगर साम्राज्य सेनेची परभणीत मागणी

🔸धनगर साम्राज्य सेनेची परभणीत मागणीअनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.9मार्च):-नव्यानेच मंजूर झालेल्या परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली आहे.

सुभेदार मल्हारराव होळकर यांचं कार्य महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशवासियांना सुद्धा प्रेरणा घेण्यासारखं आहे .सर्वव्यापक कार्य असणाऱ्या सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव परभणी येथील नुकत्याच मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान सरकारने करावा.

यांचे नाव या महाविद्यालयास दिल्यास होळकर यांच्या कार्याचा नावलौकिक सर्वसामान्यापर्यंत पोहचणार आहे .अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ईमेलद्वारे मुख्यमंत्री व इतरांना निवेदन पाठविण्यात आले.