✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.9मार्च):- महिला दिनाचे औचित्य साधून रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी सोमवारी गेवराई पोलिस ठाण्यातील महिला आधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित सत्कार करुन सन्मान केला.या आगळ्या वेगळ्या पध्दतीने महिला दिनानिमीत्त स्तुत्य उपक्रम व महिलांचा सन्मान रयत शेतकरी संघटनेने केल्यामुळे महिला आधिकारी व कर्मचारी यावेळी भारावून गेल्या.तर पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी देखील आपल्या ठाण्यातील विविध महिला आधिकारी व कर्मचारी यांचा या निमित्ताने सत्कार केला.
गेवराई पोलिस ठाण्यात चोख कर्तव्य बजावत आसलेल्या या महिलांचा सन्मान केल्याने आम्हाला खुप अभिमान वाटला आसल्याचे यावेळी युवा शेतकरी सुनिल ठोसर यांनी यावेळी सांगितले.महिला पोलिस आधिकारी व कर्मचारी यांना ठाण्यात कसे दररोज आपले कर्तव्य बजावे लागते हे या निमित्ताने नागरिकांना दिसून आले.
महिला दिनानिमीत्त सोमवार रोजी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी गेवराई पोलिस ठाण्यातील आपले चोख कर्तव्य बजावत आसलेल्या महिला पोलिस आधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्याचे ठरविले.गेवराई पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले व सात ते आठ महिला कर्मचारी यांचा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी सुनिल ठोसर सह दिलीप वाघ,बाळासाहेब मोटे,संग्राम ढोले,नवनाथ आडे,बाबुराव भोईटे,गणेश ढाकणे,बाळराजे जाधव आदि तरुण शेतकरी उपस्थित होते.
तसेच यावेळी गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी देखील ठाण्यातील महिला आधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला.रयत शेतकरी संघटनेने सोमवारी केलेला सन्मानामुळे महिला आधिकारी व कर्मचारी यावेळी भारावून गेल्या.या स्तुत्य उपक्रमामुळे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.दरम्यान ठाण्यातील महिला आधिकारी व कर्मचारी हे कसे आपले चोख कर्तव्य बजावत आसल्याचे यावेळी दिसून आले.महिला दिना निमित्त झालेल्या सन्मानामुळे महिला पोलिस आधिकारी व कर्मचारी यांनी देखील यावेळी कौतुक केले