पिपर्डा येथील शेतबोडी खोलीकरण कामाला सुरुवात

31

🔸पिपर्डा येथील सरपंच आकाश भेंडारे यांच्या हस्ते भूमिपूजन

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.9मार्च):- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पिपर्डा येथील गांव शेतीतलाव लगत लागून असलेल्या भूतबोडी चे खोलीकरण कामाला दिनांक ८मार्च २०२१ पासून सुरवात झाली असून पिपर्डा येथील सरपंच आकाश भेंडारे यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.

या कामामुळे बोडी लगत लागून असलेल्या शेतीच्या पाण्याची पातळी वाढ होईल.जंगल लागून असल्यामुळे प्राणी पक्षी यांना फायदा होईल. शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी बोडीचे खोलीकरण अशी बहुविध कामे केली जात आहेत.

या वेळी उपसरपंच चंदन चुणारकर,भगवान कावळे,सुजाता चुणारकर, स्वाती चुणारकर,वनिता मानकर, दर्शना भेंडारे,ग्राम पंचायत सदस्यगण , प्रमोद मेश्राम.ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग,धनराज गजभिये रोजगार सेवक, गावातील मजूर वर्ग उपस्थिती होते