शेतकरी राजा बळीराजा समर्पित विवाह सोहळा अरुण चहारे यांचा अनोखा प्रयोग

43

🔸वाचनालयाला शिव दान आणि हनुमान मंदिराला बळीराजा समर्पण निधी देऊन समाजकार्य

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि. 10 मार्च):- कडक लाकडाउन संपल्या नंतर लग्न सोहळ्याला खूप वेग आला, आणि फारशा प्रमाणात लग्न होत गेले. यातच एक आगळं वेगळं विवेक कल्पकतेचा विचारसरणी नुसार अरुण यशोदा विठ्ठलराव चहारे यांनी शेतकरी राजा बळीराजा समर्पित विवाह सोहळ्यात लाकडाउन असल्याने अगदी साधे पनाने विवाह आटोपून सोबत बैल बंडी वर वरात काढून व पत्रिका आणी किरकोळ खर्च टाळून आपण समाजाचा एक भाग आहोत ह्या उदात्त हेतूने ब्रम्हपुरी तील वनविभागात कार्यरत लिपिक आणि शिवराय वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते अवि उर्फ अरुण यशोदा विठ्ठलराव चहारे यांनी नवीन वाचनालयाला शिव दान आणि हनुमान मंदिराला बळीराजा समर्पण निधी देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला.