अतिक्रमणे नियमानुकुल करून अहमदनगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यात यावी

    52

    ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

    अहमदपूर(दि.12मार्च):- दि.नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव ॲड.डाॅ केवल जी उके,राज्य सचिव वैभव गीते, यांच्या आदेशाने नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रेरणा आप्पासाहेब धेंडे व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादा जाधव,पुणे निरीक्षक पांडुरंग गडेकर व दौंड शहर अध्यक्ष प्रकाश पारदासानी,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पारधी परिवर्तन परिषदचे दिगंबर काळे,तालुका उपाध्यक्ष विजय भोसले,बाळू आप्पा जाधव यांनी श्रीगोंदा नायब तहसीलदार योगिता ढोले व गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांना शासन परिपत्रक क्रमांक: ग्राम विकास विभाग,प्रआयो – २०१८/प्र. क्र.२५६/योजना – १०, दिनांक १६ फेब्रुवारी,२०१८ रोजीच्यां शासन निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतचे निवेदन दिले व संबधित निवेदन अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले.

    सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा वरील नमूद शासन निर्णय संदर्भाधीन शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.या धोरणांतर्गत राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीच्यां मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णयातील परिशिष्ट – क मध्ये देण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वकष कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    शासन परिपत्रक नुसार सर्वासाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयान्वये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबविण्यात यावी अशी मागणी नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिसच्या (NDMJ) च्या वतीने मागणी करण्यात आली आहे.यावेळी सागर काळे,माडरे काळे,ईश्वर काळे आदी उपस्थित होती