टेकेपार रिठ परिसरात वाघाची दहशत

    41

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

    चिमूर(दि.13मार्च):-तालुक्यातील टेकेपार परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.आज या परिसरात वाघाचा वावर असून टेकेपार रिठ येथील शेत शिवारात वाघाने हल्ला करुन शेळी ठार केली आहे.

    टेकेपार रिठ शेतशिवारतील श्री विलास चटपकार यांचे शेतातील नाल्यावर एक वाघ आढळून आला. ही माहिती वनविभागाला देताच वन कर्मचारी स्पॉटवर पोहचले. या वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यावे अशी विनंती वन विभागाला करण्यात आली आहे.