राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत वझर येथे गणस्तरीय कार्यशाळा संपन्न

29

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७.

देगलुर(दि.13मार्च):- तालुक्यातील वझर ग्रामपंचायत मध्ये आज दि.13/3/2021 रोजी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माझा गाव माझा विकास व वार्षिक विकास आराखडा तयार‌ करणे यासाठी गणस्तरीय कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच सौ.उज्वलाताई आनंदराव पळणीटकर व प्रमुख पाहुणे म्हणून एस.एम. कानडे (ग्रामविस्तार अधिकारी देगलुर)व तसेच सुर्यवंशी साहेब देगलुर, ग्रामविकास अधिकारी सौ.ए.सी.फुलारी यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे शुभारंभ सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी कानडे एस.एम. यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.माझा गाव माझा विकास या बाबतीत सखोल असे मार्गदर्शन उपस्थित ग्रामस्थांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उप सरपंच श्री नरसिंग नारायण चोरमल्ले सर यांनी केले. या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अनंदराव पाटील पळनीटकर,शांताराम पाटील,ग्रा.पं.सदस्य सुनिता देविदास माने,माजी पं.स.सभापती लक्ष्मणराव बिचे,माजी सरपंच भिवाजी लवटे,अनाल वलकले,नारायण बिरादार,नरसिंग मदने,हणमारेड्डी बिजलवाडी, जुबेर मुल्ला,गोपाळ कंनजे,माधव खरात , हणमंतराव शिंदे व वझर गणातील सर्व ग्रा.पं.सरपंच व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.