माजी आमदार एकनाथ साळवे यांच्या निधन- सेवानिवृत्त सनदी अधिकारी इ. झेड.खोब्रागडे यांची प्रतिक्रिया

25

माजी आमदार एकनाथ साळवे यांच्या निधनाची बातमी वाचली, वाईट वाटले, संविधान फौंडेशन चे वतीने विनम्र आदरांजली.

मी अहेरी ला एसडीओ आणि चंद्रपूर ला RDC असताना, त्यांचे कार्य मला जवळून पाहता आहे. सामाजिक परिवर्तनाचा विचार सांगताना स्वतः त्यानुसार वर्तन करताना मी त्यांना पाहिले. तथागत बुद्धाचा। विचार जगणारे आणि प्रचार प्रसार करणारे बहुजन समाजातील निष्णात वकील म्हणून सुपरिचित होते. गोरगरीब आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील ,नक्सल प्रभावित क्षेत्रातील आदिवासी च्या केसेस कोर्टात लढवून त्यांना माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अन्याय होऊ नये यासाठी त्यांचा संघर्ष कायम होता. मानवी हक्काचे पुरस्कर्ते असल्यामुळे हिंमतीने ते करीत असत. मी जवळून बघितले.

माझ्या “आणखी एक , पाऊल” या पुस्तकात आमदाराचे अपहरण हे एक chapter आहे. नक्सलवाद्यांनी अपहरण केलेल्या अहेरी येथील आमदार यांची नक्सलवाद्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका व्हावी या मोहिमेत एकनाथराव साळवे आणि मी होतो. तेव्हा, मी चंद्रपूर ला RDC होतो. माझे शासकीय बंगल्यात बसून strategy ठरवत , साळवे साहेबांचा सल्ला मानून तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी निर्णय घेतला. चंद्रपूर जेल मध्ये असलेल्या शिव्वना naxlite ला सायंकाळी जंगलात नेऊन सोडले आणि त्याच रात्री, 17 दिवसानंतर , नक्सलवाद्यांनी आमदार यांना साथीदारासह साळवे साहेबांच्या घरी सुखरूप पोहचवीले. थरारक घटना होती. Adv जयंत यांना हा आखोदेखा प्रसंग माहीत आहे.
Adv एकनाथ साळवे यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

✒️इ झेड खोब्रागडे(संविधान फौंडेशन,नागपूर)
दि 14.03.2021.