नगरसेवक मुरलीधर जाधव यांचा वाढदिवस साजरा

25

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.14मार्च):-कोल्हापूर राजारामपुरी प्रभागाचे गेले पंचवीस वर्ष नगरसेवक कार्यरत असणारे मुरलीधर जाधव वाढदिवस हॅपिनेस योगा थेरेपी या ग्रुप कडून ऑक्सिजन पार्क येथे कोरोना च्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवत साजरा करण्यात आला. जाधव यांनी गेली पंचवीस वर्ष सत्तेवर असताना प्रभागातील लोकांच्या समस्या बरोबर शारीरिक फिटनेस साठी अनेक उपक्रम व योग अभ्यासाकडे लक्ष दिले आहे.

यावेळी नगरसेवक जाधव बोलताना म्हणाले हॅपिनेस योगा थेरेपी यांच्याकडून गेले अनेक वर्ष ऑक्सिजन पार्कमध्ये घेण्यात येणारे योग यामुळे सर्व वयातील लोक एकत्र येत आहेतच त्याचबरोबर त्यांचे आरोग्यही चांगले झालेले दिसून येते. 85 वयातील लोक ही येते मला धावताना दिसत आहेत, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. अशा कार्यासाठी मदतीचा हात घ्यायला मला आवडेल.यानंतर सुरेश चंद्र शहा म्हणाले सर्वसामान्यांचा नेता म्हणजे मुरलीधर जाधव होय.

आपल्या प्रभागात बाहेरही अनेक उल्लेखनीय कार्य केले आहेत ही कौतुकास्पद आहे असे म्हणत भावी महापौर जाधव असावेत ही अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे स्वागत सुरेशचन्‍द शहा व उल्का शहा यांनी, प्रास्ताविक बी.के. पाटील, सूत्रसंचालन शिवाजी पाटील व आभार मोहन शेटे यांनी मानले.यावेळी गायत्री मांगले, रोहिणी केस्तीकर, सौ नागवेकर याच बरोबर हॅपिनेस योगा थेरेपी चे 200 महिला व पुरुष सभासद उपस्थित होते.