चंद्रपूर जिल्ह्यात (दि.14मार्च) रोजी 24 तासात 70 कोरोनामुक्त – 118 कोरोना पॉझिटिव्ह

92

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.14मार्च):-जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 471 झाली आहे. सध्या 905 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 31 हजार 924 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख पाच हजार 271 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 364, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 118 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 41, चंद्रपूर तालुका 16, बल्लारपूर दोन, भद्रावती 10, ब्रम्हपुरी 15, नागभिड चार, मूल तीन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा चार, वरोरा 11, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज(14 मार्च) 31 नवीन कोरोना बाधित तर 21 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.14मार्च):- आज जिल्हयात 31 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 21 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9886 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9537 वर पोहचली. तसेच सद्या 241 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.44 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला.

नवीन 31 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 20, अहेरी तालुक्यातील 4, आरमोरी तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 1, तर वडसा तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 21 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 13, अहेरी 1, चामोर्शी 4, धानोरा 1, तर कुरखेडा मधील 2 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साई ट्रॅव्हल्स जवळ 1, नवेगाव 2, पोटेगाव बायपास रोड 2, गोकुलनगर 2, राणी दुर्गावती विद्यालय 5, कलेक्टर कॉलनी 2, एमआयडीसी रोड 2, वनश्री कॉलनी 1, स्थानिक 1, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया 1, चामोर्शी रोड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, स्थानिक 1, आलापल्ली 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये भगतसिंग वार्ड 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चिंचोडा 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये खिदवई वार्ड 1, लाखांदुर रोड 1, सीआरपीएफ कॅम्प 1, जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.