इको-प्रो तर्फे रामाळा तलाव स्वच्छता अभियान श्रमदान सुरूवात

49

🔸रोज नियमित सकाळी सहा ते नऊ वेळेत श्रमदानासाठी आवाहन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15मार्च):-इको-प्रो तर्फे रामाळा तलाव संवर्धनाचे ‘अन्नत्याग सत्याग्रह’ आंदोलन संपताच 15 मार्च पासुन नियोजीत असलेल्या ‘श्रमदान’ कार्यक्रमास आजपासुन सुरूवात करण्यात आली. आज तलावाची पार असलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे झाडी-झुडपे काढुन तसेच गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन व छटपुजा दरम्यानची मडकी व जलपात्र संकलन करित अभियानाची सुरूवात करण्यात आली.

रामाळा तलाव संवर्धनाच्या आंदोलनासोबतच तलाव स्वच्छता संदर्भात नियोजीत असलेली श्रमदानाने लोकसहभागातून करावयाची कामाकरीता इको-प्रो ने आज सकाळी सुरूवात केली. सकाळी सहा ते नऊ या वेळेदरम्यान इको-प्रो चे सदस्य एकत्रीत येत नियमित रोज स्वच्छता करणार आहेत. यात प्रामुख्याने किल्लाच्या भिंतीतुन निघालेली वृक्ष-वेली, झाडी-झुडपे काढण्यात येणार आहे. तलावाच्या काठावर जमा झालेली गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन तसेच छटपुजा दरम्यानची मडकी, जलपात्र संकलन करून त्यांचा पुर्नवापर वृक्षारोपण आणि पक्षी जलपात्र म्हणून सुध्दा करण्यात येणार आहे.

आज इको-प्रोच्या सदस्यांनी विसर्जन पाॅईटच्या दोन्ही बाजुस किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली झाडी-झुडपे काढली. यापुर्वी महानगरपालीका कर्मचारी यांनी सुध्दा काही झाडे काढलेली आहेत. तलावाच्या भिंतीमधुन निघालेल्या या वृक्षामुळे तलावाच्या पुर्वेकडील भिंती पुर्णपणे कोसळली असुन हि झाडे वेळीच मुळासकट काढण्यासाठी तसेच ते नष्ट करण्याची गरज असून ते करण्यासाठी पुरातत्व विभाग सोबत मिळुन इको-प्रो ने कार्य हाती घेतले आहे. काल काही विद्यार्थ्यांनी सुद्धा तलाव काठावरील प्लास्टीक जमा करून स्वच्छता केली.

रामाळा तलाव संवर्धनासाठी नुकतेच झालेल्या इको-प्रो च्या आंदोलनाच्या समर्थनात आलेल्या सर्व संस्था संघटना यांना इको-प्रो कडुन आवाहनाचे पत्र पाठविण्यात आलेले असुन प्रशासनाकडुन मशीनरी च्या साहय्याने होणाऱ्या कामाव्यतिरीक्त लोकसहभाग व श्रमदानातुन करावयाचे कामासाठी सक्रीय सहभाग घेण्यास विनंती करण्यात आलेली आहे. तसेच रोज सकाळी सहा ते नऊ वेळेत सहभागी होणारे नागरीक-संस्थाना कोणती कामे करता येण्यासारखी आहेत याचे मार्गदर्शन सुध्दा करण्यात येणार आहे.

पुढील उन्हाळयाचा काळातील येणारी 90 दिवस अत्यंत महत्वाची असुन तलाव कोरडा होणे आणी तलाव खोलीकरण यास हा वेळ पुरेसा नसल्याने, यात या दिवसाचे योग्य नियोजन करून काम पुर्णत्वास जाईल याकरीता प्रशासनाकडुन सुध्दा लवकरात लवकर कामाची सुरूवात होणे अपेक्षीत आहे. भारतीय पुरातत्व विभागाची या कामास परवानगी आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परवानगी आणी तलाव कोरडा होईस्तोवर श्रमदानातुन होणारी कामे करता यावी म्हणुन 15 मार्च पासुन नियमित अभियान राबविण्यात येत आहे. यात सहभागी होण्यास विवीध माध्यमाने नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. लोकसहभागातुन करावयाची कामे आणी आपला सहभाग नोंदविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी केले आहे.