नासिक कळवण सप्तशृंगी देवीचा गडाचा तीर्थक्षेत्र “ब “वर्गात समावेश

32

🔹भाविकांची होणार गैरसोय दूर

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.15मार्च):-साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तशृंगी गडाचा तीर्थक्षेत्र “ब ” वर्ग दर्जात समावेश करण्यात आला आहे, यामुळे गडावरील वरील विविध विकासकामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद महाविकास आघाडी सरकारतर्फे करण्यात आल्याने गडाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

-गडावरील जवळपास ३७४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या कक्षेत येत असून अवघे ९  हेक्टर क्षेत्र स[सप्तशृंगी गड ग्रामपंचायती अंतर्गत येते उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. सप्तशृंग गड २००१ पासून “क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र होते. सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत उपलब्ध सुविधांची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. अंतर्गत रस्ते आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. भगवती मंदिर परिसरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अतिशय अल्प निधी मिळतो.

त्यामुळे कामे करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्यामुळे सप्तशृंगी गड तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने  तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री तथा विद्यमान कृषी मंत्री दादा भुसे , माजी आमदार जे पी गावित, आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून सातत्याने माजी उपसरपंच गिरीष गवळी व राजेश गवळी व ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे सप्तशृंगी गडास “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सप्तशृंगी गडास सुमारे २५ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

  सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी ग्रामपंचायत व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रयत्नशील असून सप्तशृंगी गडावरील पाणी टंचाई, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, जलवाहिनी, सुलभ स्वच्छता गृह, निवारा शेड, भक्तनिवास, बसस्थानक, गावांतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मुख्य रस्त्यावर डोम, निवारा शेड, व्यावसायिक गाळे, भाविकांसाठी चिंतन हॉल व प्रतीक्षागृह, सुसज्ज्य रुग्णालय आदी कामांचा विकास आराखडा तयार असून मंजुरीसाठी अंतिम टप्यात आहे..