सर्वजाती धर्माच्या गरिबांची अतिक्रमने नियमनुकूल करा-वैभव गिते

    37

    ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

    अहमदपूर(दि.15मार्च):-दि.महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी सांगणकीय प्रणाली टप्पा 2 साठी उद्याची 15 मार्च 2021 ही तारीख अंतिम आहे.असे शासनाने दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून लिहलेला पत्रात म्हंटले आहे.ज्या गावांमध्ये एकही अतिक्रमण नाही.

    त्या ग्रामपंचायतींना अतिक्रमण नसल्याचा ठराव ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करणे ज्या गावांमधील ग्रामसेवकांनी अतिक्रमण धारकांची माहिती शासनाच्या वेबसाईटवर भरलेली नाही त्यांना दिनांक 15 मार्च 2021 पर्यंत भरायला लावा अन्यथा सर्वजाती धर्मांच्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होणार नाहीत त्यामुळे एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.मोठ्या मेहनतीने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या तीव्रआंदोलनानंतर व मंत्रालयीन पाठपुराव्यानंतर शासनाने अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी दुसरा टप्पा जाहीर केला आहे.

    अनेक तालुक्यातील गटविकास अधिकारी जाणून-बुजून टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे ग्रामसेवकांवर अंकुश राहिलेला नाही बहुतांश गावांमध्येतर ग्रामसेवकाना या संदर्भातील शासननिर्णयच माहिती नाही.शासनाच्या धोरणांची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असल्याने कर्तव्यात कसूर करणाऱ्या गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी प्रधान सचिव महसूल विभाग मंत्रालय यांच्याकडे केली आहे…