सेवानिवृत्त डॉक्टर महारुद्र गुजर यांनी घेतली कोव्हीड लस

    38

    ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो- 8080942185

    केज(दि.17मार्च):-):-संपूर्ण राज्यात सध्या कोव्हीड19 या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसून येत आहे.त्यामुळे देशभरासह संपूर्ण राज्यात किरोनाप्रतिबंधक लस नागरिकांना देण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून केज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बनसारोळा येथे 9 मार्च पासून प्राथमिक आ. केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील जेष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षापुढील रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या लोकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.

    प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नायगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. महारुद्र गुजर वय 80 वर्षे यांनी कोव्हीड 19 च्या लसीचा पहिला ठोस घेतला.कोव्हॅक्सिन लस घेणारे नायगाव येथील ते पहिले नागरिक ठरले आहेत.लसिबाबत कसलीही भिती न बाळगता सर्वांनी लस घेण्याचे आवाहन नायगाव च्या आशा स्वनसेविका संध्याताई मुजमुले यांनी गावातील नागरिकांना केले आहे.