खामगाव शेगाव चौपदरीकरण झालेल्‍या रस्‍त्‍यालगतच्‍या ॲपरोच रस्‍ते बनवून द्यावे

    40

    ?प्रभाग ७ चे किशोरआप्‍पा भोसले सह नागरिकांची मागणी

    ✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    खामगाव(दि.17मार्च):-कशेगाव रस्‍त्‍याचे चौपदरीकरण तसेच सुशोभिकरणाचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे. परंतु खामगाव शहरातील रस्‍त्‍यालगतच्‍या वस्‍त्‍यांमध्ये ॲपरोच जाण्यायेण्याच्‍या रस्‍त्‍याची कामे आज पर्यंत पुर्णंतः बाकी असल्‍याचे दिसून येत आहे. जवळपास सात, आठ रस्‍ते अजूनपर्यंत बनविणे बाकी आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वास्‍तविक पाहता शहरामध्ये आलेला हा खामगाव शेगाव रस्‍ता अंदाजे एका वर्षाअगोदर पुर्ण झालेला आहे. हा रस्‍ता पुर्ण झाल्‍या बरोबरच संबंधित ठेकेदाराने या रस्‍त्‍यालगतचे ॲपरोचचे रस्‍ते मुख्य रस्‍त्‍यापासून कमीतकमी १०० मिटर बनवून देण्यास हवे होते. त्‍यांनी फक्‍त चांदमारी भागाकडे जाणारा एक रस्‍ता बनवून दिला असून बाकी छोटे छोटे ॲपरोच रस्‍ते अजूनपर्यंत बनवून दिलेले नाहीत आणि हे छोटे छोटे रस्‍ते सामान्‍य नागरिकांच्‍या दैनंदिन वापरातले असून ते पुर्णपणे व्‍यवस्‍थित नसल्‍याने परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे.

    त्‍यामुळे कितीतरी अपघातही या दुरावस्‍था झालेल्‍या रस्‍त्‍यांमुळे घडले आहेत. यामध्ये प्रभाग सात मधील रॅलीज प्‍लॉट भागामधील रस्‍ते व शेगाव नाका भागातील रस्‍ते, खेडकर प्‍लॉट भागामधील रस्‍ते तसेच ख्रिश्चन स्‍मशानभुमी रस्‍ता, बोबडे कॉलनी डेपोजवळील रस्‍ता हे प्रमुख रस्‍ते असल्‍याने या परिसरातील नागरिकांनी व किशोरआप्‍पा भोसले यांनी हे ॲपरोच रस्‍ते बनविण्याकरीता ना.नितीनजी गडकरी साहेब, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभागा अकोला, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रेणी १, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खामगाव,मा.आ. राणा दिलीपकुमारजी सानंदा यांचेकडे हे ॲपरोच रस्‍ते बनवून मिळावे याकरीता मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.