काव्यपुष्पांतून केला महिला जागर

35

🔸शब्दछंद परिवाराचे ऑनलाईन कवयित्री संमेलन उत्साहात

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.17मार्च):-महिला दिनाचे औचित्य साधून शब्दछंद परिवाराचे ऑनलाईन कवयित्री संमेलन मोठा उत्साहात नुकतेच पार पडले.”आज स्त्री कितीही शिकली तरीही खेड्यापाड्यात नव्हेच तर शहरातही तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्रियांना त्यांचा हक्कासाठी लढावे लागते .स्रियांवर अन्याय करणाऱ्यांना जनतेनेच शासन करावे” असे प्रखर विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व वक्त्या मा. शिलाताई सांभारे यांनी मांडले.”स्त्री ही आगळी वेगळी आहे कारण तिचा विकास हा मनाकडून शरीराकडे होणारा आहे” असे सांगत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध समुपदेशिका आणि वक्त्या सरिताताई चितोडकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात ही मा. भाग्यश्री बागड यांच्या स्वागतगीताने झाली तर काव्यसंमेलंनाची सुरवात शिल्पा कोठावदे यांनी श्री शिक्षणाच्या आद्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्यावरील काव्याने झाली.माधुरी अलई यांनी वृत्तबद्ध कवितेतून स्त्री जीवन उलगडले,स्वाती काळे यांची गझल मनाला भावली, वैष्णवी पाडळे यांनी साध्या सोप्या शब्दात भावपूर्ण रचना सादर केली ,निर्मला पाटील यांनी कवितेतून संपूर्ण स्त्री व्यक्तिमत्त्व उलगडले,अरुणा कांबळे यांची रचना ह्रदयाला स्पर्शून जाणारी,पूनम सुलाने यांची वास्तवावर प्रकाश टाकणारी ,अश्विनी खंडांगळे यांनी मनाला भावनारी रचना ,अक्षदा काफरे- कराळे यांची स्त्री जन्माचे दुःख आणि कर्तृत्व व्यक्त करणारी,संगीत महाजन यांची स्त्री चा कार्यगौरव सांगणारी तर शेवटी स्वाती काळे यांनी स्त्री ला सुंदर गझलेत गुंफले .अशा प्रकारे आशययुक्त. दर्जेदार कविसंमेलन पार पडले.
कार्यक्रमाचे यथोचित प्रास्ताविक मा. माधुरी चौधरी यांनी केले.
मा.योगिता पाखले यांनी कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत आणि सर्वाचा उत्साह वाढवत नियोजित वेळेत कार्यक्रम संपन्न झाला. मा. पाखले यांनी सर्वांचे सहृदय आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमातील सर्व मान्यवर ,कवयित्रीसह शब्दछंद परिवाराच्या वतीने ऑनलाईन सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरव केला.या कार्यक्रमासाठी शब्दछंद समूह प्रशासक मा. ज्ञानेश्वर काळे,कविता कोर,सॅम चव्हाण यांनी मेहनत घेतली.