घरातून दारूसाठा जप्त करणे हा राजकीय मंडळींचा कट- सौ. कीर्ती महेश भर्रे यांचे मत

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.17मार्च):- ब्रम्हपुरी नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरातून मोठा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई बुधवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील विशेष भरारी पथकाने केली. पक्षाच्या जिल्हयातील मोठ्या नेत्याशी भर्रे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून, या कारवाईचे सुत्र गोंदियाशी जुळले असल्याची चर्चा ब्रम्हपुरीत रंगत आहे . परंतु ही चर्चा खोटी असल्याचे महेश भर्रे यांच्या पत्नी सौ. किर्ती महेश भर्रे यांनी केली आहे. दि.10 मार्च 2021 रोजी आमचे राहते घरातून किवा ताब्यातून कुठल्याही प्रकारचा महासाठा प्रत्येक्षात हस्तगत करण्यात आलेला नाही. ज्या वाहन क्रमांक MH 01- AL 2153 मधुन दारुसाठा जात केल्याचे बोलले जात आहे. त्या वाहनाशी माझ्या पतीचा व आमचा काहीही देणंघेणं नाही.

माझे पती महेश भरले हे नगरसेवक व राजकारणी असल्यामुळे सदर न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा उहापोह केल्या जात आहे. माझे पती यांनी अधिवक्ता ॲड. दीपक शुक्ला यांचे मार्फत मा. जिल्हा व सत्र न्यायालय येथे त्यांच्या विरुद्ध नोंद अ.प. क्र. 108/21 या मध्ये अटक पूर्व जामीन मिळण्याकरिता रीतसर न्यायिक मार्गाने अर्ज सादर केलेला आहे. सदर अर्जावर दिनांक 18 मार्च ला सुनावणी होणार आहे. कोणत्याही व्यक्तीची मा. न्यायालयातून पूर्णतः दोष शिद्धी होइस्तव त्यास अपराधी संबोधण्याचा व घोषित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे असताना देखील माझे पतीचे साई बाबांच्या प्रतीमे जवळ असलेला फोटो चक्क अनेक साप्ताहिक व वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्याचा सपाटा काही राजकीय मंडळींनी चालवलेला आहे.त्यांना शिक्षा होणे पूर्वीच त्यांचे नाव व फोटो साप्ताहिकात छापण्याची कारवाही ही बे कायदेशीर असून या विरोधात आम्ही लवकरच कारवाही करणार आहोत.

7 वर्ष पेक्षा कमी कीवा 7 वर्षापर्यंत शिक्षा प्रस्तावित असलेल्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्याची आवश्यकता नाही. असा मा. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे. व माझे पती हे तपासास मदत करीत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी करण्याचा प्रयत्न आहे. माझे पतीची अटकेची मागणी करणाऱ्यांच्या काहींच्या भावावर तर काहींच्या नातेवाइकांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद मालडोगरी व अर्हेर नवरगाव गावामध्ये झालेली आहे. याचे निवेदन देणाऱ्यानी भान ठेवणे गरजेचे आहे. असे सौ. कीर्ती महेश भरले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.