साक्री तालुक्यातील महावीर जैन यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धुळे जिल्हा समन्वयक पदावर नियुक्ती

    52

    ✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

    धुळे(दि.18मार्च):- शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब , युवासेना प्रमुख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते खासदार संजय राऊत व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ,उत्तर महाराष्ट्र समन्वयक उपनेते आ.रविंद्र मिर्लेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार व धुळे व नंदुरबार जिल्हासंपर्क प्रमुख बबनराव थोरात व शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी , यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व बळसाने गावाचे उपसरपंच महावीर जैन यांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धुळे जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी नुकतेच मुंबई येथे दिले.

    राज्यातील सर्वसाधारण व गरजू तसेच अर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत आणि सवलती च्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात काम करण्यासाठी जैन यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.

    या निवडीबद्दल शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे,उपजिल्हाप्रमुख भुपेश शहा,आधार हाके,किरण जोंधळे,शानाभाऊ सोनवणे,भरत राजपूत, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील,डॉ.सुशील महाजन,युवासेना जिल्हायुवाधिकारी पंकज गोरे,तालुकाप्रमुख पंकज मराठे,चंद्रकात म्हस्के,हिम्मत साबळे,गिरीश पाटील,हिम्मत साबळे,दीपक चारमुले, अमोल सोनवणे, चंद्रकांत देवरे,यांनी अभिनंदन केले.