इंदिरानगर मध्ये सांडपाणी रस्त्यावर, नाल्या तुडुंब भरल्या

25

🔺नप चे दुर्लक्ष असल्याचा पप्पू शेख यांचा आरोप

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.18मार्च):-चिमूर नगर परिषद अंतर्गत इंदिरानगर दोन प्रभागात अस्तिवात असून प्रभाग क्रमांक 8 मधील विरुरकर यांचे घरा पासून ते राजू भैसारे यांच्या घरा पर्यत च्या नाल्या तुडुंब भरल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर आले असल्याने आरोग्य धोक्यात येत आहे नप ला वारंवार सांगून ही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप युवक कांग्रेस चे पदाधिकारी पप्पुभाई शेख यांनी केली आहे

इंदिरानगर वस्ती ही दोन प्रभागात असून याकडे संबंधित नगरसेवक यांनी विकास कामे करणे कडे दुर्लक्ष केले आहे या प्रभागातील विरुरकर यांचे घरा पासून ते राजु भैसारे यांचे घरा पर्यत नाल्या उपसा केल्या नाही नप ला वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत आहे सांड पाणी रस्त्यावर येत आहे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ नाल्या उपसा करण्याची मागणी युवक कांग्रेस पदाधिकारी पप्पूभाई शेख यांनी केली आहे