दिव्यांगास ट्रि सायकलचे वितरण

27

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.18मार्च):-दिव्यांग सहाय्यदिनाचे औचित्य साधुन दिव्यांग बांधवास दिव्यांग शक्तीच्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अज्ञात दानदात्याच्या सौजन्याने दोन्ही पायाने जन्मता अपंग असलेल्या नरेंद्र चव्हाण वय वर्ष ३६ रा.मोची गल्ली खामगाव याला तो करत असलेल्या व्यवसायासाठी त्याची गरज पाहुन दिव्यांगास ट्रि सायकलीचे वितरण दि. १८/०३/२०२१ला सा.दिव्यांग शक्ती कार्यलयात करण्यात आले.

यावेळी दिव्यांग शक्तीचे मार्गदर्शक भरतभाई बुध्ददेव,संपादक मनोज नगरनाईक,बेरोज्यासर, प्रकाश हातेकर,अर्जुन डिवरे,एम के पाटील,प्रशांत देशमुख,अजय तराळे,वैभव देशमुख, आदी हजर होते.परिसरात असलेल्या अत्यंत होतकरु कष्ठ करणारे असंख्य दिव्यांग आहेत त्यांचेसाठी दानदात्यांनी पुढे यावे असे भावनिक आव्हान विराट दिव्यांग फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक च्या वतिने करण्यात आले आहे.