धम्मगिरी मृगदायवन याठिकाणी दहा दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन

23

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18मार्च):- तालुक्यातील राणीसावरगाव येथील धम्मगिरी मृगदायवन याठिकाणी 19 मार्च ते 29 मार्च च्या कालावधीत बौद्ध धम्माची शिकवण देण्यासाठी दहा दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अनेक उच्च विद्याविभूषित भिक्खू संघाचे मार्गदर्शन या शिबिरात लाभणार आहे.

29 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद होणार असून या बौद्ध धम्म परिषदेत भंते ज्ञानज्योती हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.तरी या होणाऱ्या श्रामनेर शिबिर व बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन भंन्ते नागज्योती यांनी केले आहे.