वीज बिल वसुलीत महावितरण कडून दुजाभाव

    39

    ?महावितरण आणि सरकारकडून शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी केले जात आहे प्रवृत्त

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

    सोलापूर(दि.18मार्च):-संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा ऐन उन्हाळ्यात खंडित करण्यात आला आहे. महावितरण व सरकार यांच्या संगनमताने ही *कुठल्याही शासकीय आदेश नसताना पाशवी वीजबिल वसुली चालू आहे*
    सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रक्कम वीज बिलापोटी महावितरण कडून मागितली जात आहे. कुठे ५ हजार, तर कुठे ३ हजार, कुठे २५०० हजार याप्रमाणे वसुली चालू आहे.

    ऐन उन्हाळ्यातच सुरू आहे वसुली मोहीम
    आधीच कोरोनामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, आणि त्यात ही मुघली वीजबिल वसुली. पहिलाच निसर्ग साथ देत नाही, आणि निसर्गाने साथ दिली तरहे गेंड्याच्या कातडीचे असहिष्ण सरकार वीज खंडित करत आहे* ऐन उन्हाळ्यातच वीज कनेक्शन कट केली जात आहे.शेतकर्यांच्या नावाने मते मागून हे राजकीय पक्ष सत्तेत येताच त्यांना शेतकर्यांचा विसर पडतो. महावितरण व सरकार शेतकर्यांना करत आहेत आत्महत्येसाठी प्रवृत्त ऐन उन्हाळ्यात वीज खंडित करून सरकार व महावितरण शेतकर्यांना एक प्रकारे आत्महत्येसाठी प्रवृत्तच करत आहे.