कवी गणपत माखणे यांचा विठ्ठल पाटील मित्र मंडळाने केला सत्कार

27

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.18मार्च):-94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल युवा व्याख्याते कवी गणपत माखणे यांच्या विठ्ठल पाटील मोरे व त्यांचा मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आला. सदरील सत्कार सोहळ्यासाठी कामठा येथील सरपंच खंडू काळसरे , परमेश्वर करंडे, खंडोजी करंडे, तेजस माखणे, मंगेश माखणे , पंकज करंडे , नितीन करंडे, शंकर आवटे , व इतर मित्र मंडळ उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील मोरे यांनी ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रांमध्ये गणपत माखणे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन केले आहे.विठ्ठल पाटील मोरे हे एक युवक सामाजिक कार्यांमध्ये नेहमी तत्पर असतात. शेतकरी कुटुंबात जीवन जगत असताना देखील विठ्ठल पाटील मोरे यांना समाजसेवेची आवड आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असतात . शेतीशी नाळ जोडलेल्या अशा या भावनिक मनाच्या कार्यकर्त्यांनी कवी गणपत माखणे यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .