चंद्रपूर जिल्ह्यात (दि.18मार्च) रोजी 24 तासात 97 कोरोनामुक्त 136 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

116

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18 मार्च):- जिल्ह्यात मागील 24 तासात 97 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 136 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 264 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 846 झाली आहे. सध्या 1011 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 40 हजार 610 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 12 हजार 252 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये अरविंद नगर, चंद्रपूर येथील 67 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 407 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 368, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 136 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 53, चंद्रपूर तालुका 12, बल्लारपूर आठ, भद्रावती 14, ब्रम्हपुरी 11, नागभिड आठ, सिंदेवाही तीन, मूल तीन, सावली दोन, राजुरा एक, चिमूर सात, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात आज(18 मार्च) 54 नवीन कोरोना बाधित तर 27 कोरोनामुक्त

गडचिरोली(जिमाकादि.18: आज जिल्हयात 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10020 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9618 वर पोहचली. तसेच सद्या 294 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.99 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.93 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला.

नवीन 54 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 23, अहेरी तालुक्यातील7, आरमोरी तालुक्यातील 3, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 2, तर वडसा तालुक्यातील 12 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 27 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 16, अहेरी 1, आरमोरी 2, चामोर्शी 1, धानोरा 1, कोरची 1, कुरखेडा 1, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

यनवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस हॉस्पीटल 1, शिवाजी नगर ग्रामसेवक कॉलनी 1, नवेगाव 5, स्नेहानगर 1, स्थानिक 1, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया 1, साईनगर 1, कर्मवीर विद्यालय अर्मिझा 3, रांगी 1, रामनगर 1, शिवाजी हायस्कुल, पोर्ला 2, आशा निकेतन चर्च वसा 2, शिवाजी स्कुलच्या मागे 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, नागेपल्ली 4, कनेपल्ली 1, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वांखी 1,वैरागड 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये सोमनपल्ली 1, आष्टी 1, स्थानिक 1, वायगाव 1, गणेशनगर 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये रामगड 1, मेंढेगाम 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, फॉरेस्ट कॉलनी 3, किदवई वार्ड 1, मोहटोला 1, उसेगाव 2, चप्राड 1, कुरुड 1, भगतसिंग वार्ड 1, चिखली रिथ 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.