सत्तातरांचे पडघम

35

सत्ता देणे सोपे अाहे शहाणपण देणे कठीण आहे ” -बर्क

सह्याद्रिच्या उंच कड्यावरुन वाहणाऱ्या मनशोक्त चक्रवाताने अक्राडविक्राड रूप धारण केले आहे.कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रवात तुफान मुंबईच्या दिशेनं झेपावलं आहे.हे वारं नेमकं काय करेल याचा नेम नाही.वसंतऋतूतील रक्तवर्णी पळस आपले रंग उधळत होता . उष्मकालिन राजा नव्या निर्मितीतचा सृजनोत्सवात दंगून गेला आहे.सारे वृक्ष पर्णहिन झाले आहेत.साऱ्या रानवाटा ओसाड झाल्या आहेत.मानवी मनाला नवी पालवीची आशा आहे.पण पुन्हा टाळेबंदीकडे राज्य जात आहे. कोविड-१९ च्या महामारीने सारे वर्ष मलूल झालं होतं.माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला होता.ज्याच्या घरचे या महामारीने प्रभावित झाले त्यांना दुःखाशिवाय काहीच मिळाले नाही.आरोग्याच्या अभावामुळे अनेक माणसे मृत्यु पावले.समाजप्रिय माणूस समाजअप्रिय ठरत आहे.मात्र राजकारणातील गर्जनारे चाळीस वारे बेभानं होऊन देशावर अक्राडविक्राड रूप धारण करून नाचत आहेत.

श्रीमंतानी व भांडवलदारांनी आपले उखळ पांढरे केले आहे.मुक्त व कमीश्रम मोबदल्यात देशाच्या नागरिकांचे शोषण होत आहे.कामगार , शेतकरी,बेरोजगार,डॉक्टर,नर्स,वार्ड बाय,स्त्री, वंचित,आदिवासी , अल्पसंख्यांक यांना अतिशय कष्टप्रधान आयुष्य जगावं लागत आहे.राजा स्वतःच्या बेफिकरीने देशाचा तारू हाकलत आहे.अठरावर्षापूर्वीच्या असामाजिक व कौर्यभरी व्यवस्था देशावर अधिराज्य गाजवत आहे.तडीपार असलेले नेते देशाच्या सुरक्षतेच्या पदावर कार्यरत आहे.सारा देश त्यांचा उच्छाद उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. संसदेतील अनुसूचित जाती व जमातीचे खासदारांनी आपले गुलामपण स्वीकारले आहे.आरक्षित पदावर निवडून येणारा हा नेता स्वतःच्या जीवनासाठी जगत आहे.आपल्या देशाचा व समाजाचा विचार सोडून पक्षाचा मांडलिक झाला आहे.स्वतःचे मरण स्वतः पाहत आहेत. काही विरोधी पक्ष विरोध करण्याचे ढोंग करत आहेत.त्याचा आतून पाठींबा असतो तर बाहेर विरोधी आहोत असे भासवत आहेत.

स्वतःला जानता राजा म्हणणारा किमयागार राजकिय प्यादे खेळत आहे.लोकशाहीच्या खांबाना सगळेच पोखरत आहेत .समाजवादी राज्य ही संकल्पना मोडून भांडवलदारी व कंपनी धोरण अवलंबल्या जात आहे.राजकिय सत्तातरांत जेवढे पतन झाले नव्हते तेवढे पतन आजच्या राजकिय स्वार्थ लोकांनी केले आहे.मध्यमवर्गीय समजणारा घटक यावर खुश होता.धर्म व जातीच्या विखारी नशेनं त्याचा मेंदू तयार झाला होता.धड स्वतःच पण मेंदू दुसऱ्याचा अशी गत शिकल्यासवरल्यांची झाली आहे.आंबेडकरी समाज संघटना ,शेतकरी संघटना,किसान संघटना,विद्यार्थी संघटना,या स्वतःच्या ताकतीने किल्ला लढवत आहेत.पण बहुसंख्य जनता अजूनही अंधभक्तीतून जागी होत नाही ही देशाची शोकांतिका आहे.विकास मॉडेलची बेभान नशा त्याच्या मेंदूत ठासून भरली आहे.फुकटच्या फ्री डाटाने काही तरूणाई मोबाईलवेडी होत आहे.शेल्पीच्या नादात स्वतःची गुलामगिरी स्वतः ओढवत आहे.आज मध्यमवर्गीय लोकांची नौकरी जात आहे.हा वर्ग कधीही आंदोलनात येत नव्हता जेव्हा त्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली तेव्हा आंदोलनात सामील झाला आहे.खाजगीकरणाला विरोध करत आहे.

संविधानिक लोकशाहीत बहुमत असलेल्या पक्षाला कायदे करण्याचा अधिकार असतो ते आपला अधिकार वापरून संसदेत कायदे करतात.ते कायदे संविधानिक की असैंवधानिक हे तपासण्याचे काम न्यायपालिकेचे आहे.पण आज हीच न्यायपालिका राजकिय लोकांच्या प्रभावाखाली आलेली काही कार्यावरून दिसून येते.आरक्षित पदावरून निवडून गेलेले नेते बिनमेंदू व असक्रीय असल्याने ते समाजाचे प्रतिनिधित्व न करता पक्षाची हुजूरीगीरी करत आहेत.हा वर्ग जागृत झाला तर सत्तातरांची नवी पडघम पाहायला मिळू शकते.उधानलेले वादळ नव्या राजकिय समीकरणाची नवसुत्रे मांडत चालला आहे.गगनमय मुंबईच्या अवकाशात काळोखमय पयोद थयथय नाचत आहेत.संपृक्तयुक्त बाष्प एंटीलियाजवळ नियोजितबंध षडयंत्र पार पाडत आहेत.रात्रीच्या मंदप्रकाशात स्कार्पिओ व इतर चारचाकी आपले काम फत्ते करण्यात यशस्वी होत आहेत.मास्टरमाईंडा खेळाडू नव्या रणनीतीचा डाव टाकत आहे.त्या डावात सत्ताधारी व्यवस्था करकचून सापडली आहे.

मालकाचे श्वानच्छ आपली भूमिका योग्य पार पाडत आहेत.मालक मोठा खुश आहे.कारण काही न करता देशातील विरोधी आवाज दाबल्या जात आहे. गोदी मीडियाने आपण फक्त सत्तेचे गुलाम आहोत हे परत एकदा सिध्द केले आहे.सुशांत राजपूत,कंगणा राणावत ,तबलिकी जमात,अन्य घटनाच्या रिपोर्ट वरून असे लक्ष्यात येते की ही एक बनावटगीरी आहे.मुख्य प्रश्नांना डावलून भ्रम पसरविण्याचे षडयंत्र भारतीयांने आेळखले पाहिजे.लोकशाहीचा चौथा खांब स्वतःचा चेहरा हरवत चालला आहे.सत्तेची चाटुगीरी करण्यात गोदी मीडिया तल्लीन आहे.ही भूमिका संविधानिक व्यवस्थेला सुरूंग लावणारी आहे.यातून पुनर्रजीवी संघटनांचे चांगले फावते.पुरानातील वांगी नव्या वर्तमानात चढ्याभावाने विकल्या जात आहे.घेणारा ग्राहक कोणतीही शहनिशा न करता विकत घेत आहे.विकत घेणारा हा धार्मिक कपोलकल्पित ग्रंथाची चिकित्सा जानुनही सतर्क होत नाही याला अज्ञानी मनावेच लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १०जून१९५० एका भाषणात म्हणतात की,”जुन्या घातक प्रवृतीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे”पण आज आपण असे वागतो का प्रश्न निर्माण झाला आहे. ही धर्माची नशा नक्कीच देशाला अराजकतेकडे घेऊन जाणारी आहे.

वेदनेचे कल्लोळ सारीकडे पसरले असून भारतीय जनता भयकंपित होत आहे.काही जनता स्वतःला असुरक्षित पाहते आहे.संविधानाने दिलेले अधिकार डावलल्या जात आहेत.अल्पसंख्याक व दलित समाजावर नवे दृष्टच्रक फिरवल्या जात आहे.झुडिंचे दंगलशास्त्र निर्माण करून छुपेदंगलक्षेपणास्त्राचे नवे थवे देशाच्या अनेक भागात अंधादुंध प्रयोग करत आहेत.
महाराष्ट्र पोलीस हे देशातील कार्यतत्पर पोलीस यंत्रणा असतांना राजकिय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे विकलांग होत आहे.मुंबई पोलीस हे जागतिक पातळीवर नावलौकिक असलेली यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहेत.ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महार बटालियन व मराठा बटालियन यांनी देशाच्या रक्षणासाठी स्वतःची अस्मिता दाखवली आहे.आजही भारतीय सैन्यात या बटालियनचा बोलबाला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे महार बटालियनची स्थापना झाली आहे.महाराष्ट्राला आज अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे .महाराष्ट्र उद्योगधंदे पळविल्या जात आहे .मुख्य आँफिस बाहेर जात आहेत.महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.
मालकांच्या इशारावर सारे विरोधक व सत्ताधारी महाराष्ट्राला मागे नेत आहेत.संविधानिक पदावरील व्यक्तीही संविधानिक जबाबदारी सोडून आकाची जबाबदारी पार पाडत आहे.महाराष्ट्रातील राजकिय व्यवस्थेचे नको तेवढे पतन आज होत आहे.फुले -शाहू -आंबेडकर विचाराचे कार्यकत्ये व सामाजिक चळवळी सोडल्या तर बाकी काही संघटना कोमेजून गेल्या आहेत.महाराष्ट्रातील क्रांतीजाणिवा पुसल्या जात आहेत.आज विद्यार्थांचे प्रश्न अक्राडविक्राड बनले.

शेतकरी,कामगार,बेरोजगार,स्त्रीया यांच्या समस्या वाढल्या आहेत.धनाड्याच्या फायद्यासाठी शासकिय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.तीन पक्षाच्या सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे.जिलेटिन प्रकरण नव्या दिशेनं जाणार आहे. जिलेटिनचे नागपूचे कनेक्शन तपासणात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्ताने मा़ोठा लेटर बाँम्ब फोडला आहे.यातून प्रशासन व मंत्रीमंडळ ,गृहखाते यांचे विरोध पुढे आले आहेत . जनसामान्याचे हित न साधता नेते व प्रशासनातच जुपली आहे.लोकांची स्वार्थी वृत्ती कमी न देता कोरोना काळातही मोठी बोकाळली आहे.उद्याेगपतिच्या घराजवळच्या प्रश्नांने राजकिय उलथापालथ दिसून येत आहे. या प्रकरणातून मोठा राजकिय भांडवली भुकंप होणार यात शंका नाही.मॉस्टरमाईंडची नशा फार उतरणार आहे. सत्तेत नसणारे व असणारे यांचे वस्त्रहरण होणार आहे.प्रशासकिय यंत्रणा कमजोर होत आहे.शेतकरी आंदोलनामुळे देशाचे तथ्थ डळमळलेले आहे . अनुसूचित जाती व जमातीचे खासदारांनी नवा पवित्रा घेतल्यास नवे राजकिय समीकरण घडण्याची चिन्हे भविष्यात दडली आहे.पाच राज्याच्या निवडणूकितून वर्तमान सरकार हतबल होणार आहे.यामुळे महाराष्ट्र व केंद्र सत्ताचे डोलारे हलू लागले आहेत.नव्या सत्तातरांचे पडघम पाहायला मिळत आहेत.

✒️लेखक:-प्रा.संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००