बेरोजगार दिव्यांगांनी अर्थमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह राज्याच्या अर्थसंकल्पाची केली होळी

40

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.22मार्च):- कोरोना या संसर्गामुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील विस लाखांच्या वर संख्या असलेल्या दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनासाठी अर्थसंकल्पात तरतूद न ठेवल्यामुळे तसेच वाढती बेरोजगारीसह गत पाच ते सहा महिन्यांपासून रखडलेल्या निराधार मानधनासाठी हि अद्याप निधी उपलब्ध करून दिला नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडुन दि २२ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह राज्याच्या अर्थसंकल्पाची होळी करत आपला रोश व्यक्त केला आहे.

या दरम्यान पोलिसांनी आंदोलन कर्त्यांकडील अर्थमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेताच दिव्यांगांकडुन अर्थमंत्र्यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परीसर दणानुन काढला त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना एक निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की एवढ्यावरच जर शासन स्तरावरून अर्थसंकल्पात सुधारणा करून दिव्यांगांसाठी भरीव तरतूद न ठेवल्यास लवकरच यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे आणि यास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आजच्या या आक्रमक होळी दहन आंदोलनात राहुल साळवेसह.प्रदिप गुबरे.विष्णु जायभाये,फेरोज खान हदगावकर,अमरदिप गोधने.नागनाथ कामजळगे.कार्तिक भरतीपुरम.प्रशांत पळसकर.शेषेराव वाघमारे,विठ्ठल सुर्यवंशी.संजय धुलधाणी.रवि कोकरे.आनंदा माने.संतोष गजलवाड.सिताराम साळवे.प्रदिप हणवते.भोजराज शिंदे.नारायण नवले.विश्वांभर दळवे.राजु इराबतीन.प्रशांत हणमंते.हणमंतराव राऊत.संजय सोनुले.मधुकर वाघमारे.सय्यद आरीफ.जयपाल आडे.सय्यद अफरोज.विठ्ठल डोंगरे.शेख आलीम.कोंडिबा कदम.किरणकुमार न्यालापाली.नागोराव साळंखे.संदिप पवार.बाबुराव वानोळे.काशिनाथ ढगे.भाऊसाहेब टोकलवाड.धोंडिंबा कांबळे.मधुकर वाघमारे.लक्ष्मण मामीडवार.शंकर गिमेकर.विनोद रत्नपारखे.शेख आलीम.राजेश्वर मामीडवार.सुरेश वाघमारे.सरोजा बिलावार.कमलबाई आखाडे आणि सविता गावते यांच्यासह असंख्य दिव्यांग सहभागी झाले होते.