स्प्रिंग उत्सव 2021 आयोजनात थोरवी पिसेचा सहभाग

34

🔸इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी आय आय टी खडगपूर महोत्सवात ब्रम्हपुरीची कन्या

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.22मार्च):- इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी आय आय टी खडगपूर च्या वतीने यावर्षीचा स्प्रिंग फेस्ट 2021 महोत्सवाचे नुकताच आयोजित करण्यात आले होते. या तीनदिवसीय उत्सवाला ब्रह्मपुरी येथील व आयआयटी खडकपूर ची विद्यार्थिनी थोरवी देवेंद्र पिसे हिने सहभाग घेतला होता.
हा उत्सव आशिया खंडातील सामाजिक आणि संस्कृती क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्प्रिंग फेस्टिवलमध्ये बारा प्रकारचा समावेश केला गेला असून 130 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सदर उत्सव कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना 35 लाख रुपये बक्षिसाची बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, लोकांचे जीवनमान सुधारणे, ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक व शैक्षणिक अडचणीचा सामना कसा करावा तसेच आयआयटी चे महत्व काय हे पटवून देण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे यात नृत्य, नाटक ,संगीत, फॅशन ,साहित्य असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

सदर उपक्रमात ब्रह्मपुरी येथील कुमारी थोरवे देवेंद्र विषयी हिने या आयोजित उत्सवात ऑनलाइन द्वारे सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना आयआयटी चे महत्व त्याच बरोबर ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक अडचणी कशा दूर होतील, सामान्य माणसाचे जीवनमान कसे उंचावेल ,शिक्षणाच्या संधी, खडकपूर येथील आय आयटी सेक्टर याबद्दल विस्तृत ज्ञान घेऊन विद्यार्थ्यांना येणारा पिढीला किती उपयुक्त आहे व स्वतःच्या विकासाच्या संधी व रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील हे ज्ञान अवगत करून परिसरातील विद्यार्थ्यांना प्रबोधन करीत आहेत.